सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा !
कोल्हापूर येथे हिंदुत्ववाद्यांची बैठक
![]() |
हिंदुत्ववाद्यांच्या बैठकीत बोलतांना अधिवक्ता श्री. रणजित घाटगे |
कोल्हापूर,
- सध्याचा काळ हिंदुत्ववादी
संघटनांच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. यापूर्वी देशात काँग्रेस शासन होते
आणि त्यांनी हिंदुविरोधी असल्याने हिंदु संघटनांना लक्ष्य करून
कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांना जीवनातून उठवले. सध्या
हिंदुत्ववादी शासन असूनही काँग्रेस राजवटीपेक्षा वाईट अनुभव येत आहे. सर्व
हिंदु संघटनांनी संघटित होऊन आक्रमणास विरोध केला पाहिजे. सनातन संस्था
सध्या जात्यात असून अन्य संघटनांवर केव्हाही वरवंटा फिरू शकतो. आम्ही सर्व
हिंदु संघटना निरपराधी असणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठान
हिंदुस्थानचे शहरप्रमुख आणि अधिवक्ता श्री. रणजित घाटगे यांनी येथे
नुकत्याच घेण्यात आलेल्या हिंदुत्ववादी संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत केले.
येथील महादेव मंदिरात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
उपस्थित धर्माभिमानी...
या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहरप्रमुख आणि अधिवक्ता
सर्वश्री रणजित घाटगे, आशिष लोखंडे, हिंदु एकता आंदोलनाचे अण्णा सावंत,
धर्माभिमानी राहुल भोई, ज्ञानेश्वर अस्वले, पंकज कुरणे, धनंजय पाटील,
उत्तम पाटील, मंगेश बसवंत, दीपक माने, नितीश कुलकर्णी, अक्षय थोरात,
विश्वास काळे, हिंदु जनजागृती समितीचे सुधाकर सुतार, रमेश शिंदे आदी
धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचा प्रारंभ श्री गणेश वंदन
करून, तर सांगता श्रीकृष्णाचा श्लोक म्हणून करण्यात आली.
प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी हे हिंदु
धर्मावरील आघाताविषयी माहिती देतांना म्हणाले की, देशातील हिंदूंची संख्या
जलदगतीने घटत आहे. आगामी काळात हिंदूंवर अत्याचार वाढल्यानंतर अन्य देशात
हिंदूंना आश्रय घेऊ दिला जाणार नाही.
धर्माभिमान्यांनी बैठकीत व्यक्त केलेली मते अशी...
१. श्री. संजय कुलकर्णी, महराष्ट्र उपाध्यक्ष, हिंदु महासभा - डॉ. नरेंद्र
दाभोलकर हत्या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन
संस्थेचे साधक यांना अटक करून विनाकारण नाहक त्रास दिला जात आहे.
यापूर्वीही कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचा साधक
श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट करूनही अन्वेषण चालूच आहे.
पोलिसांकडे ठोस पुरावा काहीच नाही. अशाच पद्धतीने सर्व हिंदु संघटनांचे
शिरकाण केले जाण्याची शक्यता आहे. याला संघटितपणे विरोध करण्यात येईल.
यातून पोलिसांनी आम्हाला अटक केली, तरी आम्ही अटकेत रहाण्याच्या सिद्धतेत
आहोत.
२. धर्माभिमानी श्री. सुमित ओसवाल - पुरोगामी संघटनांच्या सूचनेनुसारच
सध्याचे शासन चालू आहे, असे वाटते. पुरोगामी आणि मुसलमान संघटना अशांतता
माजवून देशाला अस्थिर बनवत आहेत. हेच देशद्रोही असून त्यांना कोणतीही
शिक्षा होत नाही; मात्र अध्यात्म आणि धर्मप्रसार करणार्या सनातन संस्था
आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बंदीची मागणी केली जाते. मी स्वतः जैन
असून आम्ही सर्व जैन, शीख, बौद्ध आदी हिंदू आहोत. मी भाजपमध्ये असलो, तरी
मी हिंदु धर्मात जन्माला आलो आहे. प्रथम धर्म आणि नंतर पक्ष असतो. आम्ही
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पाठीशी आहोत.
३. धर्माभिमानी श्री. संजय पौंडकर - राज्यकर्ते, पुरोगामी, मुसलमान यांच्या
संकटापासून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांला सर्वांनी संरक्षण
दिले पाहिजे. तसेच विविध आंदोलने करून सनातन संस्थेवरील बंदीचे सावट दूर
होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !
लोकांना वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार !
या बैठकीत कोल्हापूर शहरामध्ये श्री महालक्ष्मी मंदिरातील भवानी
मंडप, शिवाजी चौक आणि बसस्थानक परिसरात उभे राहून लोकांना सनातन संस्था आणि
हिंदु जनजागृती समितीवरील खोट्या कारवाईची वस्तुनिष्ठ माहिती देऊन
स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे ठरविण्यात आले.
Post a Comment