कोल्हापूर/- -
सनातन संस्थेवर बंदी घालणे एवढे सोपे नाही, ते अशक्य आहे. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या आम्ही नेहमी पाठीशी आहोत, असे ठाम आश्वासन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले. पुरोगामी संघटनांच्या दबावाखाली येऊन शासन सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे बेळगाव, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. मनोज खाडये, तसेच कार्यकर्ते श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी यांनी ११ जुलै या दिवशी श्री. क्षीरसागर यांची भेट घेऊन चर्चा केली.
या वेळी समितीच्या वतीने पुरोगामी नेत्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांना गुंतवून चौकशीच्या नावाखाली त्यांचा चालू असलेला छळ थांबवावा आणि सनातनवर बंदी घालण्याच्या मागणीला विरोध करावा, या मागणीच्या संदर्भातील निवेदन श्री. क्षीरसागर यांना देण्यात आले.

Post a Comment