कणकवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेश
भोगले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे
शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या भोगले यांच्यासह जयसिंग
नाईक, नारायण कुबल यांचे कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना
जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी ४ जुलैला स्वागत केले. या वेळी
बोलतांना आमदार वैभव नाईक म्हणाले, भाजपाने साथ सोडली, तरी शिवसेनेवर फरक
पडत नाही. अनेकांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात सेनेला अधिक बळकटी आली
आहे. २०१९ या वर्षी विधानसभेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असेल.
Post a Comment