नवी देहली - डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) ६ सप्टेंबर या दिवशी पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या संदर्भात सी.बी.आय.ने एक प्रसिद्धीपत्रक त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. 'अजून पुढील अन्वेषण चालू असून हत्येचा कट आणि त्यात सामील असलेल्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींची ओळख अजून पटलेली नाही. दाभोलकर हत्याप्रकरणी आतापर्यंत झालेले अन्वेषण हे सी.बी.आय.ने आतापर्यंत केलेल्या तपासावर आणि गोळा केलेल्या पुराव्यावर अवलंबून असून भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत गुन्हा न्यायालयात निष्पक्ष सुनावणीनंतर सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष आहेत, असेच मानले जावे', असे म्हटले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात डॉ. दाभोलकर यांची हत्या ही दोन खाजगी संघटनांच्या दीर्घ वैमनस्याने आणि द्वेषपूर्ण व्यवहाराने झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खाजगी संघटनांचा उल्लेख करतांना सनातन संस्थेचा उल्लेेख केलेला नाही. डॉ. दाभोलकर हे सातारा येथील एका संघटनेचे संस्थापक असून दुसरी खाजगी संघटना कोल्हापूर येथे अस्तित्वात असल्याचे म्हटले आहे.
Post a Comment