हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची 'आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम' !
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर आेंकारेश्वर घाटावर संरक्षक कठडे बसवले !
पुणे - हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ठिकठिकाणी 'आदर्श गणेशोत्सव मोहीम' राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने या मोहिमेच्या अतंर्गत पुणे आणि चिंचवड येथे ६ सप्टेंबर या दिवशी आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भाविकांनी वहात्या पाण्यात विसर्जन केले.
१. येथील गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या संदर्भात आेंकारेश्वर घाटावरील असुविधा आणि सर्व समस्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्या. महापालिका प्रशासनाने नदीला पाणी न सोडल्याविषयी, तसेच पालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. या सर्व घडामोडींची माहिती वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. त्यानंतर त्यांनी आेंकारेश्वर पुलावर संरक्षक कठडे बांधण्यास प्रारंभ केला.
२. आेंकारेश्वर घाटावर श्रीगणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्यासाठी महापालिकेचे जीवरक्षक उपलब्ध नव्हते, तसेच काही जीवरक्षक लांब उभे असल्याने ते दिसतही नव्हते. या घाटावर संरक्षक कठडे नव्हते. त्यामुळे श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करणार्या भाविकांची सुरक्षा ऐरणीवर आली होती.
महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस
यांच्याकडून कृत्रिम हौदात विसर्जन करण्याची बळजोरी !
१. भाविक आेंकारेश्वर पुलावर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन आल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस भाविकांना बलपूर्वक सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदात मूर्तींचे विसर्जन करण्यास भाग पाडत होते. 'तुम्ही गटारीसारखे पाणी असलेल्या नदीत श्रीगणेशमूर्तींचे कशाला विसर्जन करता. तुम्ही महापालिकेच्या हौदात मूर्तींचे विसर्जन करा', असे पोलीस भाविकांना सांगत होते.
२. त्यामुळे भाविकांचा नाईलाज झाल्याने काही भाविकांना इच्छा नसतांना हौदात मूर्तींचे विसर्जन करावे लागले.
३. भाविकांचे प्रबोधन केल्यावर भाविकांनी कर्मचारी आणि पोलीस यांना न जुमानता शास्त्रानुसार वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले.
४. महापालिका प्रशासनाने नदीमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था न केल्याने नदीतील अल्प पाण्यात मूर्तींचे विसर्जन करावे लागले.
Post a Comment