BREAKING NEWS

Saturday, September 3, 2016

न्यायालयाने दिला सुरेश अलोणे यांच्या बाजूने निकाल श्री संत गजानन महाराज देवस्थानचा वाद मिटला


चांदूर रेल्वे- (शहेजाद खान)-
शहरातील संताबाई यादव नगरातील श्री संत गजानन महाराज देवस्थान विश्‍वस्त मंडळाचा वाद अखेर मिटला आहे. चार वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर न्यायालयाने सुरेशराव अलोणे यांच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांच्या कार्यकारिणीला नोंदणी क्रमांक प्राप्त झाला आहे.

शहरात संताबाई यादवनगर येथे श्री संत गजानन महाराज देवस्थान आहे. या परिसरातील व शहरातील भाविकभक्तांनी मोठय़ा निष्ठेने सन २००५ मध्ये या मंदिराची स्थापना केली. दरवर्षी गजानन महाराजांचा प्रगटदिन सर्व भाविकभक्त आनंदाने साजरा करतात. परंतु या परिसरातील काही नागरिकांमध्ये मंदिराचे महत्व पाहून मालकीहक्क निर्माण करण्याची लालसा निर्माण झाली व विश्‍वस्त होण्यासाठी त्यांनी जनतेला माहीत न होऊ देता प्रस्ताव सहायक धर्मदाय आयुक्त, अमरावती यांच्या न्यायालयात सादर केला. या सर्व कार्यात सुरेशराव तिखे यांची महत्वाची भूमिका होती. ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी या विरोधात लगेच २०१२ मध्ये प्रस्तावाविरोधात हरकत दाखल केली.

तिखे यांच्या कार्यकारिणीविरोधात सुरेशराव अलोणे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी कार्यकारिणी तयार करून जानेवारी २०१३ च्या नगर परिषद ठरावात नाहरकत प्रमाणपत्राचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार अलोणे यांच्या कार्यकारिणीचा प्रस्ताव न्यायालयात सादर करण्यात आला. सतत चार वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर सहायक धर्मदाय आयुक्त, अमरावती यांनी २० फेब्रुवारी २०१६ ला सुरेशराव अलोणे व कार्यकारिणी ग्राह्य धरून या कार्यकारिणीला नोंदणी क्र.२४७७ प्राप्त झाला. मात्र या निर्णयाविरोधात तिखे यांनी पुन्हा वरील न्यायालयात धाव घेऊन अपिल दाखल केले असता सुरेशराव अलोणे यांच्याकडून अँड़पाटील व अँड़देशपांडे यांनी युक्तीवाद केला. मात्र न्यायालयात तिखे यांचा पराभव होऊन अलोणे यांचा निकाल ग्राह्य धरण्यात आला. त्यामुळे या मंदीर कार्यकारिणीचे अध्यक्ष सुरेशराव अलोणे असून उपाध्यक्ष सुभाषराव ढाकूलकर व त्यांची इतर कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.

ही कार्यकारिणी कार्यरत असून मंदिराला कोणत्याही प्रकारचे दान किंवा वर्गणी देताना रितसर पावती घेतल्याशिवाय व्यवहार करू नये व तेव्हा मंदिराचे नवीन अध्यक्ष सुरेशराव अलोणे तसेच सुभाषराव ढाकूलकर, अशोकराव तळोकार व इतर संचालकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
   

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.