BREAKING NEWS

Saturday, September 3, 2016

जावरा येथे पोळा उत्साहात साजरा


चांदूर रेल्वे- (शहेजाद खान)

श्रावण मासाच्या शेवटी शेतकर्‍यांचा मोठा सण म्हणजेच पोळा. दरवर्षी पोळा हा सण साधारणत: अमावस्येच्या दिवशी सर्वत्र साजरा करण्यात येतो. परंतू यावर्षी मात्र अमावस्या बुधवारी दुपारी २ वाजतापासून सुरु होऊन गुरुवारी दुपारी २.३० वाजता समाप्त झाल्यामुळे तालुक्यातील जावरा येथील काही शेतकर्‍यांनी बुधवारी तर काही शेतकर्‍यांनी पोळा हा सण गुरुवारी उत्साहात साजरा केला.

पोळा हा बैलांप्रती कृ तज्ञता व्यक्त करणारा सण आहे. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे. बैलांकडून बाराही महिने काम करवून घेण्यात येते. शेतीची मशागत करवून घेण्यात येते. परंतु पोळय़ाचा दिवस त्यांच्या विश्रांतीचा असतो.

या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना धुऊन सजावट करुन मारोती मंदिरात नेतात. त्यानंतर गावातील पटांगणावरील तोरणात नेऊन त्यांना धूप दाखविल्यानंतर पोळा फुटतो. असा हा पोळा जावरा येथे मोठय़ा दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी काही नागरिकांनी आपले बैल वाजतगाजत तोरणात आणले होते. येथे लहान मुलांपासून सर्वांनीच गर्दी केली होती. पोळा फुटल्यानंतर सजविलेल्या बैलांना घरोघरी नेण्यात आले व त्यांची यथोचित पूजा करुन नैवेद्य देण्यात आला.
    

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.