आज स्त्रियांवर होणार्या अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे. प्रशिक्षण घेतल्यानेच त्यांच्यात अत्याचाराला प्रतिकार करण्याची मानसिकता निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती चौधरी यांनी केले.
श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी सांगितले, प्रत्येक जण आज सामाजिक दुष्प्रवृत्तींचा अनुभव घेत आहे; मात्र तरीही सगळे मूग गिळून गप्प आहेत. भ्रष्टाचाराने प्रत्येक क्षेत्रात परिसीमा गाठली आहे. यातच धर्मनिरपेक्षतेच्या धोरणामुळे धार्मिक समस्यांनीही उच्छाद मांडला आहे. यावर एकच उपाय म्हणजे हिंदूंचे संघटन करून सनातन धर्म राज्य म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करणे होय.
गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश श्री. विनोद कोंगरे यांनी, तर महर्षींचा संदेश श्री. नामदेव उरकुडे यांनी वाचून दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले.
Post a Comment