BREAKING NEWS

Saturday, September 3, 2016

मातंग समाजाचा अमरावतीत आज महामोर्चा- पिंपळखुटा येथूल नरबळी प्रकरण.

विदर्भ ब्युरो चिफ-(शहेजाद खान)- :

पिंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थानच्या आश्रमात प्रथमेश सगणे या चिमुकल्याचा गळा चिरुन नरबळी देण्याचा प्रयत्न झालो. यातील मुख्य आरोपी शंकर महाराजांना अटक करुन नार्को टेस्ट घेण्यात यावी यांसह अन्य मागण्यांसाठी शनिवारी ३ सप्टेंबर रोजी मातंग समाजाचा महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चाला विविध संघटना, राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा आहे.
स्थानिक राजकमल चौकातून सकाळी ११ वाजता हा महामोर्चा निघणार आहे. ज्येष्ठ नेते दादासाहेब क्षीरसागर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. राजकमल चौकस्थित वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मोर्चाला प्रारंभ होईल. पुढे जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट, इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ाचे पूजन केले जाईल. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. मोर्चात मातंग समाजाने मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.