कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाने
(एस्आयटी) सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना येरवडा येथील
कारागृहातून कह्यात घेऊन ३ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर येथे सातवे
सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर
उपस्थित केले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी डॉ.
वीरेंद्रसिंह तावडे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देत ८ सप्टेंबरपर्यंत
पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या बाजूने
अधिवक्ता समीर पटवर्धन आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू
मांडली. पोलिसांनी विविध कारणे देत १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली
होती. न्यायालयात उपस्थित केले असता डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी
न्यायाधिशांसमोर पोलिसांनी त्यांची चौकशी करतांना त्यांना मारहाण केल्याची
तक्रार केली.
सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने संशयित म्हणून १० जून या दिवशी अटक केली होती. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेची कोठडी संपल्यानंतर डॉ. तावडे हे गेल्या दोन महिन्यांपासून पुणे येथील येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना २ सप्टेंबर या दिवशी कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर येथील विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटी) कह्यात घेऊन कोल्हापूर येथे आणले. २ सप्टेंबर या दिवशी रात्री त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. डॉ. तावडे यांना ३ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता, न्यायालयाने वरील निर्णय दिला.
यावर न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी डॉ. तावडे यांना समोर बोलावून अंगावर कुठेकुठे मारहाण केली, हे दाखवण्यास सांगितले. यावर डॉ. तावडे यांनी पॅन्ट वर करून पायावर मारहाण केलेली खूण दाखवली. डॉ. तावडे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी न्यायाधिशांनी डॉ. तावडे यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून आणण्यास सांगितले. तपासणी केल्यानंतर प्रत्यक्ष अहवाल पाहून न्यायाधिशांनी मारहाण केल्याचा आरोप सिद्ध होत नाही, असा निष्कर्ष काढला; मात्र या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, डॉ. तावडे हे त्यांना जे गंभीर आजार असल्याचे सांगत आहेत, त्याचा उल्लेख वैद्यकीय अहवालात करण्यात आला आहे. तसेच डाव्या पायाला मुका मार लागल्याची खूण आहे.
सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने संशयित म्हणून १० जून या दिवशी अटक केली होती. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेची कोठडी संपल्यानंतर डॉ. तावडे हे गेल्या दोन महिन्यांपासून पुणे येथील येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना २ सप्टेंबर या दिवशी कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर येथील विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटी) कह्यात घेऊन कोल्हापूर येथे आणले. २ सप्टेंबर या दिवशी रात्री त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. डॉ. तावडे यांना ३ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता, न्यायालयाने वरील निर्णय दिला.
चौकशीच्या दरम्यान पोलिसांनी मारहाण केली ! - डॉ. वीरेंद्रसिंह तावडे
न्यायालयात उपस्थित केले असता डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी
न्यायाधिशांना सांगितले की, पोलिसांनी मला चौकशी करतांना मारहाण केली. मला
तोंडावर, डोक्यावर थपडा मारल्या, छातीवर बुटांनी मारहाण केली, तसेच
पायावरतीही बुटांनी मारहाण केली. पायावर बुटांनी मारहाण केल्याने मला
पायाला लागले आहे. मला मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड विकाराचा त्रास असे
गंभीर आजार असतांना पोलीस मला चौकशीच्या नावाखाली मारहाण करत आहेत.
पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मला अशक्तपणा जाणवत आहे. मला ताप आला असून
प्रचंड प्रमाणात डोके दुखत आहे. यावर न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी डॉ. तावडे यांना समोर बोलावून अंगावर कुठेकुठे मारहाण केली, हे दाखवण्यास सांगितले. यावर डॉ. तावडे यांनी पॅन्ट वर करून पायावर मारहाण केलेली खूण दाखवली. डॉ. तावडे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी न्यायाधिशांनी डॉ. तावडे यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून आणण्यास सांगितले. तपासणी केल्यानंतर प्रत्यक्ष अहवाल पाहून न्यायाधिशांनी मारहाण केल्याचा आरोप सिद्ध होत नाही, असा निष्कर्ष काढला; मात्र या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, डॉ. तावडे हे त्यांना जे गंभीर आजार असल्याचे सांगत आहेत, त्याचा उल्लेख वैद्यकीय अहवालात करण्यात आला आहे. तसेच डाव्या पायाला मुका मार लागल्याची खूण आहे.
Post a Comment