प्रमोद नैकेले /----
*अचलपूर*:-
*अचलपूर*:-
स्वामी तिन्ही जगाचा आईवीना भिकारी अशा ओळी ऐकल्यावर खरच मन भरून येतं व हेवा वाटतो त्या सगळ्या लोकांचे ज्यांना आज आई आहे.
आई या शब्दाची व्याप्ती भरपुर आहे आई म्हणजे दुधावरची साय म्हणुनच तीला आपल्याकडे माय सुध्दा संबोधतात पण काही उदाहरणे असेही आहेत की त्या ऐकल्यावर चिड आल्याशिवाय राहत नाही त्यांची ज्यांना आई असून तीची महती माहित नाही ही अभागी माता राहाटगाव चौकी जिल्हा अमरावती येथील रहिवासी जी माता कँन्सरने पीडीत असून तीची चलअचल संपत्ती तिच्या मुलाने हिसकावून घेतली व तीला घरातून काढून टाकले.आपल्या दुस-या मुलाकडे जो सरमसपूरा पोलीस स्टेशन मधे कार्यरत आहे त्याचेकडे राहत आहे.अशी ही अभागी माता म्हणजे ग.भा.कमलाबाई अंबादास आवारे(७४) आज आपल्या आजारपणाने त्रस्त आहेत साध्या उपचारासाठी त्यांचे कडे पैसे नाहीत.याबाबत त्यांनी मुलगा राजेश आवारे व सुन प्रीया राजेश आवारे यांचेबाबत तक्रार सुध्दा केली आहे पण अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही आता तरी कुणी शहाणा माणूस त्यांना न्याय मिळवून देईल काय अशी त्यांची मागणी आहे.
Post a Comment