BREAKING NEWS

Sunday, September 4, 2016

समाजसेवेच्या बुरख्याआड धर्मांतर करणार्‍या तेरेसांना संतपद देणे, हे मानवताविरोधी ! - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

पुणे - नोव्हेंबर १९९४ मधे बी.बी.सी.ने प्रसारित केलेल्या लघुपटात नरकातील परी (हेल्स एंजल) म्हणून गणना केलेल्या मदर तेरेसा यांना व्हॅटिकन सिटीने संत म्हणून घोषित केले आहे. मरणासन्न रुग्णांना धर्मांतर केल्याविना औषधोपचारही न करणार्‍या तेरेसा या समाजसेवेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर घडवून आणत. समाजसेवेच्या बुरख्याआड धर्मांतरासारखी क्रूर कृत्ये करणार्‍या तेरेसांना संतपद देणे, हे मानवतेच्या, तसेच धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्या विरोधी आहे, असे परखड मत व्यक्त करत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी तेरेसा यांना ख्रिस्त्यांकडून संतपद मिळण्याच्या घटनेचा निषेध केला आहे.
या संदर्भात महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. तेरेसा यांना मरणोत्तर संतपद बहाल करण्याच्या कार्यक्रमाला भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासमवेत १२ जणांचे एक पथक व्हॅटिकनला गेले. ही कृती म्हणजे धर्मांतराच्या षड्यंत्राला मान्यता देण्याचाच हा प्रकार आहे.
२. मदर तेरेसा या भारतातील हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी मिशनरी म्हणून आल्या होत्या. तेरेसा त्यांच्या मृत्यूसमयी म्हणाल्या, मी जे काही केले, ते लोकांना गॉडसमवेत जोडून देण्यासाठी केले. या विधानातून त्यांचा कथित समाजसेवेमागील धर्मांतराचा कुटील हेतू स्पष्ट होतो.
३. व्हॅटिकनचे मूळ स्वरूप धर्मनिरपेक्षताविरोधीच आहे. व्हॅटिकन चर्चचा इतिहास हा महिला आणि बालके यांवरील अत्याचारांनी बरबटलेला आहे. त्यासाठी पोपने नुकतीच जाहीरपणे क्षमा मागितली. चर्चमध्ये महिला आणि बालके यांवर झालेले अत्याचार इतके क्रूर आहेत की, ते पोर्नोग्राफी अ‍ॅक्टनुसार लिहिता येत नाहीत. त्यामुळे ते आज लॅटिन भाषेत उपलब्ध आहेत. ख्रिस्त्यांचे धर्मगुरु असलेल्या पोपने भारतात येऊन संपूर्ण आशिया खंड ख्रिस्तमय करा, असे आवाहन केले होते. अशा व्हॅटिकनने कुणाला तरी संत घोषित केले; म्हणून संतांची भूमी असलेल्या भारताचे नेतृत्व करणार्‍या लोकप्रतिनिधींनी तेथे जाणे, हे भारतियांसाठी लज्जास्पद आहे.
४. क्रूर धर्मांतर करणार्‍यांचा सन्मान करणे, हे मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या सौगंध मुझे इस मिट्टी की, मै देश मिटने नहीं दुंगा, मै देश झुकने नहीं दुंगा । या अभिवचनाच्या विरोधातील आहे. हिंदूंनी ३० वर्षांनंतर या देशात केवळ हिंदुहितासाठीच भाजपला बहुमत दिले; मात्र या भेटीमुळे हिंदूंमध्ये निराशेची भावना वाढीस लागू शकते. ख्रिस्ती मिशनर्‍यांनी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्यासारख्या धर्मांतराच्या विरोधात कृतीशील असणार्‍या हिंदु संतांची वयाच्या ८५ व्या वर्षी छातीची चाळण होईपर्यंत गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्याचे हिंदू कदापीही विसरणार नाहीत. ख्रिस्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेकडो स्वयंसेवकांच्या हत्या केल्याचा विसर भाजपला पडला आहे का ? हा प्रश्‍नही या भेटीमुळे निर्माण होत आहे. शेकडो स्वयंसेवकांच्या हत्या करणार्‍या ख्रिस्त्यांविषयी प्रेम नकोच ! www.vidarbha24news.com
५. जगद्गुरुपदी विराजमान असलेल्या आणि मैला-मैलांवर संत असलेल्या भारताकडे पाश्‍चात्त्य आकर्षित होत आहेत. सिल्वेस्टर स्टॅलोन मुलाचे श्राद्ध घालून मनःशांती मिळवण्यासाठी भारतात जाण्यास सांगतो, अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस् हिंदु धर्म स्वीकारते, अमेरिकेतील विद्यापिठांत भगवद्गीता शिकवली जाते, ओबामा हनुमानाची भक्ती करतात. असे असतांना भारतीय राज्यकर्त्यांनी व्हॅटिकनला एका धर्मांतरासाठी कार्यरत असणार्‍यांच्या सन्मानासाठी जाणे निषेधार्ह आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.