अवैध शस्त्रास्त्रे विकणारे संजय साडविलकर यांचे अन्वेषण यंत्रणांकडून आजतागायत अन्वेषण का नाही ? - अधिवक्ता समीर पटवर्धन
Posted by
vidarbha
on
10:00:00 PM
in
|
संजय साडविलकर यांची सीआयडी
चौकशी तात्काळ चालू करा ! - श्री. अभय वर्तक
|
पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सचिन पवार, अधिवक्ता समीर पटवर्धन, श्री. अभय वर्तक, श्री. श्रीकृष्ण माळी, सौ. मधुरा तोफखाने आणि श्री. संतोष देसाई
|
सांगली-- १४ जुलै २०१६ ला संजय
साडविलकर यांचा पोलिसांनी जबाब घेतला. हा जबाब न्यायाधिशांसमोर नोंदवण्यात
आला. या जबाबात साडविलकर यांनी वर्ष १९८५ ते १९८८ या कालावधीत माझ्याकडे
उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने गावठी पिस्तुले खरेदी आणि विक्री
करणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि तयार करणे, हा व्यवसाय करत होतो, असे
स्पष्टपणे सांगितले आहे. अशा प्रकारे अवैध शस्त्रास्त्रे विकणारे संजय
साडविलकर यांचे अन्वेषण यंत्रणांनी आजतागायत अन्वेषण का केले नाही ?
त्याहीपुढे जाऊन अन्वेषण यंत्रणांनी याउलट अशा गुन्हेगारी वृत्तीच्या
साडविलकर यांच्या जबाबाच्या आधारे डॉ. तावडे यांना कॉ. पानसरे हत्या
प्रकरणात अटक केली. त्यामुळे एकांगी अन्वेषण करून सनातनच्या साधकांना
जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे, असे स्पष्ट मत सांगली जिल्ह्याचे
अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष श्री. समीर पटवर्धन यांनी व्यक्त केले. ते
हरिदास भवन येथे २३ सप्टेंबर या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या
वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या
वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक,
श्रीशिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख श्री. सचिन पवार, माळी समाजाचे विश्वस्त
श्री. श्रीकृष्ण माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि
समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. मधुरा तोफखाने उपस्थित होत्या.
अधिवक्ता समीर पटवर्धन पुढे म्हणाले, गुन्हेगार व्यक्तीने एखादी साक्ष
दिल्यास ती ग्राह्य मानली जात नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. असे असतांना
तपास यंत्रणा साडविलकर यांनी दिलेल्या साक्षीचा उपयोग करत आहेत, हे गंभीर
आहे. अवैध शस्त्रास्त्रांच्या संबंधात साक्ष देऊनही कोणत्याही तपास
यंत्रणांनी या कालावधीत साडविलकर यांनी अवैध शस्त्रे कोणाकोणाला दिली, ही
शस्त्रे घेतल्यावर त्यांनी पुढे कोणकोणते गुन्हे केले, यांपैकी कशाचाही
तपास केलेला नाही. या गोष्टी तपास यंत्रणांविषयी शंका उत्पन्न करतात.
Post a Comment