BREAKING NEWS

Friday, September 23, 2016

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करणार !

  • पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांचे हिंदुत्वनिष्ठांना आश्‍वासन !
  • कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना केलेल्या अटकेचे प्रकरण

पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना निवेदन देतांना समस्त हिंदुत्वनिष्ठ
संघटनांचे शिष्टमंडळ (छायाचित्रकार : श्री. गजानन नागपुरे, कोल्हापूर) 

      कोल्हापूर - सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाची, तसेच पनवेल येथील सनातन आश्रमावरील छाप्याच्या वेळी नियमबाह्य कृती करणारे, तसेच सनातनची अपकीर्ती करणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येईल, असे आश्‍वासन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी हिंदुत्ववनिष्ठांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
      पोलीस अधिकारी रवी पाटील आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना मारहाण करून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या प्रकरणी उपरोक्त पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि डॉ. तावडे यांना कह्यात घेण्यापासून पनवेल येथील सनातन आश्रमावर छाप्याच्या संदर्भात कपोलकल्पित कहाण्या रचून, तसेच आश्रमामध्ये नार्कोटिक ड्रग्ज सापडल्याचा कांगावा करून सनातनला अपकीर्त करण्यापर्यंत प्रत्येक नियमबाह्य कृतीला उत्तरदायी असणारे मुख्य अन्वेषण अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, या मागण्यांचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २३ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना देण्यात आले.
      या शिष्टमंडळात ११ संघटनांचे ३२ हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. हिंदु महासभेचे सर्वश्री संजय कुलकर्णी, सचिन पाटील आणि राजेश मेथे; शिवसेनेचे किशोर घाटगे आणि शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव; युवा सेनेचे रणजित आयरेकर; श्रीशिवप्रतिष्ठानचे शरद माळी; योग वेदांत समितीचे राजमोहन स्वामी; पतित पावन संघटनेचे सुनील पाटील, आकाश नवरूखे; श्री संप्रदायाचे दिलीप कोळी, सौ. यशोदा मोरे-पाटील, भारत मोरे-पाटील, विलास साळोखे, शशिकांत पाटील; हिंदु एकता आंदोलनाचे शिवाजीराव ससे; सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक; हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधिकारी सनातन संस्थेचे साधक आणि डॉ. तावडे यांच्यावर कशा प्रकारे अन्याय करून त्यांना त्रास देत आहेत, याविषयी सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना देऊन चर्चा करण्यात आली.
या निवेदनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. पथकर आंदोलन प्रकरणातून कॉ. पानसरे यांची हत्या झाली आहे का, याची चौकशी करावी.
२. न्यायालय आणि शासन यांचे आदेश धुडकावून डॉ. तावडे यांना पोलिसांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर नेले. त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था ठेवली नाही. याविषयी अमृत देशमुख आणि सुहेल शर्मा या पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी.
३. पोलीस कोठडीत डॉ. तावडे हे जपमाळ घेऊन नामजप करत होते. ही माळ पोलिसांनी काढून घेतली. डॉ. तावडे यांनी वारंवार विनंती केल्यावर पोलिसांनी ती माळ परत दिली. वास्तविक देवतेचा नामजप करणे, हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे अशा प्रकारे डॉ. तावडे यांचा धार्मिक अधिकार नाकारणार्‍या पोलिसांवर योग्य ती कारवाई व्हावी.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.