BREAKING NEWS

Friday, September 23, 2016

अन्वेषण यंत्रणांनी दाभोलकर कुटुंबियांची चौकशी करावी ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

सातारा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
आंदोलनाला संबोधित करतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता
श्री. अभय वर्तक (डावीकडे) आणि उपस्थित हिंदु धर्माभिमानी
    सातारा - दाभोलकर कुटुंबियांनी न्यासांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले आहेत. जवळपास २० वर्षांचा हिशोब धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर केलेला नाही. डॉ. दाभोलकर यांच्या न्यासांची चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या करूनही त्याकडे तपास यंत्रणांनी दुर्लक्ष केले. महाराष्ट्रातील शाळांमध्ये वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवून शालेय विद्यार्थ्यांना लुबाडून अंनिसच्या कार्यकर्त्यांना आलिशान गाड्या वाटण्यात आल्या. अंनिसची पार्श्‍वभूमी वादग्रस्त असूनही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातनला संपवण्यासाठी एकांगी तपास केला जात आहे. वास्तविक अन्वेषण यंत्रणांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबियांची चौकशी केल्यास संपूर्ण महाराष्ट्राला सत्य समजेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. २२ सप्टेंबर या दिवशी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी वारकरी संप्रदाय, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांचे ८० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
      या वेळी वारकरी संप्रदाय ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुधन्वा गोंधळेकर, हिंंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सौ. रूपा महाडिक, सनातन संस्थेच्या सौ. विद्या कदम यांनी आंदोलनाला संबोधित केले. 
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या......
१. सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि समीर गायकवाड यांना न्याय द्या. खोट्या पुराव्यांच्या आधारे सनातन संस्थेला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र बंद करा. 
२. देशद्रोह्यांचे समर्थन करणार्‍या अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियावर बंदी घाला आणि काश्मीरमध्ये भारतविरोधी घोषणा देणार्‍या फुटीरतावाद्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा.
३. गो इंडिया गो बॅकसारख्या देशद्रोही घोषणा देणार्‍या सर्व फुटीरतावादी नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा, तसेच त्यांच्यावर आतंकवादी कायद्यानुसार कठोर कारवाई करा. 
४. समाजात अश्‍लीलता पसरवणार्‍या सनी लिओनसारख्या सर्वांवर तात्काळ कारवाई करा आणि सनी लिओनच्या संकेतस्थळावर बंदी आणून सनी लिओनला त्वरित भारतातून हाकलून द्या. 
५. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढावेत आणि अशा पद्धतीने गुन्हे करणार्‍या संबंधित गुन्हेगारांवर खटला प्रविष्ट करून त्यांना शिक्षा करा.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.