पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सचिन पवार, अधिवक्ता समीर पटवर्धन,
श्री. अभय वर्तक, श्री. श्रीकृष्ण माळी, सौ. मधुरा तोफखाने आणि श्री. संतोष देसाई
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) संजय साडविलकर यांची साक्ष लक्षात घेऊन सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्याचे न्यायालयात सांगितले. श्री महालक्ष्मी देवस्थान समितीमध्ये उघडकीस आलेल्या घोटाळ्यांपैकी श्री महालक्ष्मीदेवीच्या रथाच्या कंत्राटात मोठ्या प्रमाणात चांदीचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप संजय साडविलकर यांच्यावर आहे. या संदर्भात हिंदुु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्यामुळेच आपण कारागृहात जाऊ, असे भय निर्माण झालेल्या साडविलकर यांच्यासारख्या दुष्प्रवृत्ती सनातनवर खोटे आरोप करत आहेत. सीबीआयसारख्या देशातील सर्वोच्च अन्वेषण यंत्रणेनेही संजय साडविलकर या खोट्या साक्षीदाराला न्यायालयात उभे करून स्वतःची उरलीसुरली विश्वासार्हताही नष्ट केली आहे. राज्यशासनाने श्री महालक्ष्मीदेवीच्या रथाच्या कंत्राटात चांदीचा घोटाळा करणार्या संजय साडविलकरची तात्काळ सीआयडी चौकशी चालू करावी, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केली.
Post a Comment