BREAKING NEWS

Monday, September 26, 2016

चिपळूणमध्ये १६ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्याचा निर्णय

कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी चिपळूणमध्ये १६ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्याचा निर्णय येथे झालेल्या जिल्ह्याच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला .यावेळी सर्वांनी ‘एक मराठा-लाख मराठा’ अशा गगनभेदी घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाचे दणदणीत मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही मोर्चा केव्हा काढावा व त्याचे नियोजन करण्यासाठी चिपळुणात रविवारी दि. २५ रोजी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत जिल्ह्यातील ज्ञातीबांधवांची बैठक झाली. या बैठकीत मोर्चा रत्नागिरीत काढावा की चिपळूणमध्ये यावर चर्चा झाली तेव्हा राजापूर व रत्नागिरी येथील प्रतिनिधींचा अपवाद वगळता सर्वांनी जिल्ह्याच्या दृष्टीने मध्यवर्ती असलेल्या चिपळुणात मोर्चा काढा, अशी मागणी केली. त्यानंतर एकमुखाने चिपळूणमध्ये मोर्चा काढण्यावर सर्वांनी मान्यता दिली आणि मोर्चासाठी १६ ऑक्टोबर  ही तारीख निश्‍चित करण्यात आली. या मोर्चात जिल्हाभरातून सुमारे ५ लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
या दिवशी पवन तलाव मैदानावर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी ११ वाजता  मोर्चाला सुरुवात होईल. पवन तलाव येथून कराड रोडवरून बहादूरशेख मार्गे डीबीजे महाविद्यालयाकडून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकेल. तेथे जिल्हाधिकार्‍यांना सकल मराठा समाजाचे निवेदन दिले जाईल आणि काही वक्त्‌यांचे मार्गदर्शन होऊन मोर्चाची सांगता होईल.
बैठकीला सर्व क्षेत्रातील मराठा समाज बांधव, भगिनी आणि कॉलेज युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉलमध्ये तुडुंब गर्दी झाल्याने बैठक झालेल्या हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावर प्रोजेक्टरची व्यवस्था करून तेथेही बसण्याची सोय करण्यात आली होती.  आ. सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम सुभाष बने, रवींद्र माने, तसेच शेखर निकम, सचिन कदम, बाळा कदम, डॉ. तानाजी चोरगे, रामदास राणे, बाबाजी जाधव, केशव भोसले, विजय कदम, भाऊ जगताप, महिलांमध्ये पूजा निकम, चित्रा चव्हाण या प्रमुख मंडळींची यावेळी उपस्थिती होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.