चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /---
शेतकऱ्यांचा कष्टाचा भागीदार असलेला बैलाचा पोळा हा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. या बैलाच्या कष्टाची जाणीव चिमुकल्यांना व्हावी व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी चांदूर रेल्वे पोळा उत्सव समितीच्या वतीने स्थानिक खडकपूरमधील गोवर्धन चौकात चिमुकल्यांचा भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करून उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धा घेतली. या स्पर्धेत ३०० च्यावर बालकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप, प्रमुख अतिथी चां.रे.कृउबासचे सभापती प्रा.प्रभाकर वाघ, ग्रा.रू.चे वैद्यकिय अधिक्षक डॉ.मरसकोल्हे, ठाणेदार गिरीश बोबडे, डॉ.पंजाबराव मेटे, बंडुभाऊ भैसे आदी मान्यवर उपस्थित होते. पोळा उत्सव समिती व जानवानी परिवाराच्या वतीने आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते लक्ष्मणराव देवगीरकर, शेख कादरभाई कुरेशी, सुधाकर पाचकवडे, किसनराव दिडपाये या शेतकरी, शेतमजुरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती वच्छलाबाई बजरंगदास पेठे यांचा पातळ, चोळी व श्रीफळ देऊन सत्कार केला. उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धेत हाजी मो.सिद्दीक जानवानी यांचे स्मृती प्रित्यर्थ हाजी.मो.रफीकभाई जानवानी तर्फे ५५१ रू.रोख व स्कूल बॅग असे प्रथम क्रमांकाचे बक्षिस वैदही राजेश पोफळे हीने पटकविले. बीटीएल एचपी गॅस एजन्सी, चांदूर रेल्वे तर्फे ४५१ रू. व स्कूल बॅग असे व्दितीय क्रमांकाचे बक्षिस हिमांशु राहुल सुलभेवार यांनी पटकविले. स्व.महादेवराव माकोडे स्मृती प्रित्यर्थ प्रशांत माकोडे तर्फे ३५१ रू. व स्कूल बॅग असे तृतीय क्रमांकाचे बक्षिस सक्षम राजेश केने यांनी पटकविले. स्व.पंडीत दत्तात्रय शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकार गुड्डु शर्मा तर्पेâ २५१ रू. व स्कूल बॅग असे चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस पियुष स्वप्निल वलीवकर यांनी पटकविले. स्व.मुन्ना दत्तात्रय शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकार गुड्डु शर्मा तर्फे १५१ रू.व स्वूâल बॅग असे पाचवे बक्षिस सोहम रवि वंजारी यांनी पटकविले. स्व.वामनराव भोयर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दत्तात्रय भोयर तर्पेâ प्रत्येकी ५० रू.चे प्रोत्साहनपर बक्षिस सोहम प्रशांत दिडपाये, सुहानी विनोद भोयर, हर्षदीप बिपिन देशमुख, दर्शन सुनिल वांढरे, साईराम शामराव गोळे यांना देण्यात आले. तसेच प्रफुल भैसे तर्फे प्रत्येकी ५० रू.चे प्रोत्साहनपर बक्षिस भाविका प्रविण भोले, अदैव राम मेंढे यांना दिले.तसेच ठाणेदार गिरीश बोबडे यांच्या तर्फे साईराम गोळे यांना १५० रूपयाचे प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व चिमुकल्यांना स्व.मुन्ना शर्मा स्मृती प्रित्यर्थ कु.विधी व शिवराज शर्मा तर्फे ३०० कलर बॉक्स देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन केशव वंजारी यांनी केले.या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन अमृतराव तिखे, अरूणराव वाघ, प्रा.रवींद्र मेंढे, हर्षल वाघ, विष्णु मोंढे, उमेश गावंडे, रूपेश भोयर यांनी काम पाहीले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साजिद जानवानी, गुड्डु शर्मा, बाल्या माकोडे, पांडुरंग वंजारी, भाष्कर वाघ, अतुल मोरे, दिगांबर गहुकार, निरज वाघ, सै.जाकिर भाई, ऋषीकेश शेलोटकर, गोलु ढांगे, भुषन वाघ, चेतन नखाते, शेखर बेराड, अजय बेराड, तुका कळंबे, सुनिल वाघ, विष्णु मोंढे, उमेश गावंडे, सुनिल मानकर, अरविंद भैसे, अतुल भैसे, पवन आगलावे, संदीप कुबडे, पराग माकोडे, स्वप्निल माकोडे, देवानंद वंजारी, प्रफुल गारोडे, राजेश केने, सद्दामभाई सह पोळा उत्सव समितीच्या कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment