BREAKING NEWS

Friday, September 16, 2016

विविध मागण्यांसाठी नागरिकांचे ८ तास रास्तारोको

अहेरी / रंगय्या रेपाकवार /--



 
                                              ★चोख पोलिस बंदोबस्त
                                      ★महिला पुरुष विद्यार्थ्यांसह हजार पेक्षा जास्ती नागरिक रस्त्यावर
                              ★वेलगुर,बोटलाचेरू,नवेगाव,वेलगुरटोला,किष्टापुरचे नागरिक सहभागी
  
विविध मागण्यांची त्वरित पूर्तता करण्यात यावी यासाठी अहेरी तालुक्यातील वेलगुर,बोटलाचेरु,नवेगाव,वेलगुरटोला,किष्टापुर च्या हजारो महिला पुरुष आणि विद्यार्थीन्नी मिळून आज पहाटे ५ वाजे पासून १ वाजे पर्यंत वेलगुर बायपास फाट्यावर सामाजिक कार्यकर्ते बबलू हकिम यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले.
   वेलगुर,बोटलाचेरू नवेगाव या जीवघेण्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी व या रस्त्याचे डांबरिकरण करण्यात यावे,वेलगुर च्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता बांधण्यात यावा,बीएसएनएल ची ३जी सेवा सुरु करण्यात यावी,विद्युत्त पुरवठा सुरळीत ठेवन्यासाठी २२० केव्ही चे स्टेशन उभारण्यात यावे,आदिवासींचे वनहक्क पट्टे वाटन्यात यावे,२०१५-१६ चे तेंदु बोनस वाटन्यात यावे,थकित असलेली एम्आरईजिएस चे मजूरी वाटन्यात यावी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरुस्ती करण्यात यावी,कर्मचारी मुख्यालयी राहन्यात यावे,विद्यार्थ्यांसाठी बंद झालेली मानव विकास ची बस पुन्हा सुरु करण्यात यावी,पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ति करण्यात यावी,अहेरी-आलापल्ली-मुलचेरा मार्गाची दुरुसती करण्यात यावी अश्या प्रमुख मागण्यांसह ईतर मागण्यांसाठी हजारो नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
   आंदोलनाची माहिती अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ति यांना देण्यात आली यावर उपविभागीय अधिकारी राममूर्ती,नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पूर्ण रस्त्याची दुरावस्था दाखविली. जिल्हा परिषद चे अहेरी उपविभागीय अभियंता मडावी,संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस,अभियंता चिंतावार,गंपावार यांनी ही लगेच आंदोलन स्थळ गाठले. येत्या १६ तारखेला सर्व विभाग प्रमुखांशी आपण चर्चा करून वेलगुर व परिसरातील विविध समस्या बाबत बैठक घेण्यात येईल व उद्या पासून रस्त्याच्या दुरुस्ती ला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन एस. राममूर्ति यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यानंतर पोलिस निरीक्षक संजय मोरे,उपनिरीक्षक निलेश साळुंखे,चांगदेव कोळेकर,छाया तांबूसकर व पोलिस कर्मचाऱ्यांच्या मध्यस्तीने नागरिकांची समजूत घालून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
    सामाजिक कार्यकर्ते बबलु हकिम यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी मुश्ताक़ हकिम,राजेश्वर उत्तरवार,प.स. सदस्य आत्माराम गद्देकार, वेलगुर ग्राप सदस्य आदिल पठाण,इरफ़ान पठाण,जि.प.सदस्य विजया विठ्ठलाणी,लैजा चालूरकर,सलीम शेख,पुष्पा अलोणे,नागेश करमे,वेलगुर च्या सरपंच कुसुम दूधी,किष्टापुर च्या सरपंच अंजना पेंदाम,तमुस अध्यक्ष रविंद्र उरेते,नागोजि कस्तूरे,लिंगा गोलेटि,तुकाराम झोड़े,विलास शेंडे,हरिचंद्र कोटरंगे,दिलीप दुर्गे,दीपक चुनारकर,श्यामराव कुमरे,देवराव माडावार,रवि गावतुरे,अरविन्द खोब्रागड़े,ऋषि सड़मेक सह हजारो संख्येने नागरिक विद्याथी महिला पुरुष आदींनी आन्दोलनसाठी सहकार्य केले.  या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रास्तारोको मुळे आलापल्ली-मुलचेरा मार्गावर दोन्ही बाजूस शेकडो वाहन अडकून पडली होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.