BREAKING NEWS

Friday, November 18, 2016

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कराड येथील सभेस अनुमती नाकारून त्यांना जिल्हाबंदी करण्यात यावी !

सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी 

पोलीस उपअधीक्षक श्री. पवार (डावीकडे) यांना निवेदन देतांना

       सातारा - कराड (जिल्हा सातारा) नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी एम्.आय्.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध दर्शवला आहे. सभा रहित करून त्यांना सातारा जिल्हाबंदी करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या वतीने जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री. पवार यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु महासभेचे कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, श्री. ओसवाल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. 
निवेदनात म्हटले आहे की,.... 
१. ओवैसी बंधूंनी आजपर्यंत विखारी भाषणांद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे देशातील सामाजिक सलोखा बिघडून अनेक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
२. लातूर येथील जाहीर कार्यक्रमात असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते की, माझ्या मानेवर कुणी सुरी ठेवली, तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही. आमदार वारीस पठाण यांनी विधानसभेत मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे विधान केले होते. 
३. देशद्रोही याकूब मेनन याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फाशीची शिक्षा सुनावल्यावरही त्याची बाजू असदुद्दीन ओवैसी यांनी घेतली होती आणि याकूबला न्याय मिळाला नाही, असे विधान केले. 
४. मध्यप्रदेश कारागृहातून पळून जाणार्‍या सिमीच्या ८ आतंकवाद्यांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यांचीही बाजू घेत ओवैसी यांनी मुसलमान असल्याने असे प्रकार घडत आहे, असे विधान केले. 
५. भाग्यनगर येथून आय्.एस्.आय्.शी संबंध असल्याच्या कारणावरून ११ मुसलमान युवकांना अटक करण्यात आली. या राष्ट्रद्रोही तरुणांना आमचा पक्ष वकिली साहाय्य देईल, असे ओवैसी म्हणाले. 
६. वर्ष २०१३ मध्ये आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केवळ १५ मिनिटे पोलिसांना बाजूला काढा. २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना धडा शिकवतील, असे हिंदुद्वेषी वक्तव्य केले होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.