BREAKING NEWS

Friday, November 18, 2016

पुण्यामध्ये धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अमानुष अत्याचार : धर्मांधाला अटक

हिंदु युवतींनो, लव्ह जिहादच्या षड्यंत्रापासून रक्षण होण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही, हे जाणा !
Image result for लव्ह जिहाद

अ‍ॅसिड फेकण्याची धमकी
सिगारेटचे चटके देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण
पोलिसांकडून तक्रार प्रविष्ट करून घेण्यास प्रारंभी टाळाटाळ

       पुणे- - कोंढवा येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या सनी अमनुल्ला मन्सुरी (वय २३ वर्षे) याच्याकडून एका २३ वर्षीय हिंदु युवतीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तो या हिंदु युवतीवर लग्नासाठी बळजोरी करत असे, तसेच रस्त्यात गाठून तिला मारहाणही करत असे. युवतीने सनी याला लग्नासाठी स्पष्ट शब्दांत नकार देऊनही त्याच्याकडून युवतीचा अघोरी छळ होत होता. विशेष म्हणजे या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास जाऊनही पोलिसांनी युवतीची नोंद घेतली नाही. त्यानंतर पोलीस आयुक्तांना केलेल्या तक्रारीत युवतीने वरीलप्रकारे तिच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी, तसेच झालेल्या मानसिक छळाविषयी अवगत केले. त्यानंतर या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सनी याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. 
१. सदर युवतीच्या आई-वडिलांचे निधन झाले असून ती गंजपेठेत एकटीच रहाते. तिचा भाऊ बेंगळुरू येथे असतो. युवतीच्या एकटेपणाचा अपलाभ घेऊन सनी याने युवतीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची फसवणूक केली 
२. सनी मन्सुरी हा व्यसनी असल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने त्याच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. १३ नोव्हेंबर या दिवशी त्याने युवतीच्या कार्यालयातून तिला बळजोरीने नेऊन रविवार पेठ, रामोशी गेट, तसेच कोंढवा मॉल येथे भर रस्त्यात मारझोड केली. 
३. एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. युवतीने प्रतिकार करतांच तिचे डोळे, छाती आणि हात या ठिकाणी सिगारेटचे चटके दिले. 
       तिने त्याच्या समवेत येण्यासाठी तुझ्या भावाला मारून टाकीन, तोंडवळ्यावर अ‍ॅसिड फेकीन, अशी धमकीही दिली. (अशा धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! - संपादक) 
४. या प्रकरणी हिंदु युवतीला धीर देत तक्रार नोंदवण्यासाठी समस्त हिंदू आघाडी, तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकर्त्यांनी साहाय्य केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.