BREAKING NEWS

Wednesday, November 16, 2016

सावित्रीच्या लेकिस उज्वल भविष्यासाठी व ज्ञानदिपाचा दिवा सतत जळत ठेवण्यासाठी विद्येचे दान -पञकार संरक्षण समितीचा असाही उपक्रम

अकोला /विशेष प्रतिनिधी /-




अकोला जिल्ह्यातील  पातूर तालूक्यातील ग्राम तांदळी खुर्द येथील  मातृछञ हरवलेल्या व घरची हलाकीची बिकट  परिस्थिती असतांना वर्ग १२ वी सायन्स  मध्ये वसंतराव नाईक विद्यालयात शिक्षण घेत असतांनी पुस्तकांची चणचण भासत असल्याने पातूर तालूका पञकार संरक्षण समितीने खारिचा वाटा उचलत कु.लक्ष्मी संतोष पारसकर या होतकरू सावित्रीच्या लेकिस उज्जवल भविष्यासाठी ज्ञानदिपाचा दिवा सतत जळत  ठेवण्यासाठी विद्येचे दान काल    दिनांक  14 - 11- 2016 रोजी  पातूर - बाळापूर मार्गावरिल जय गजानन बिछायत केंद्र पातूर येथे पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी पञकार संरक्षण समितीचे अकोला   जिल्हाध्यक्ष शेख ईब्राहिमभाई यांच्या हस्ते पुस्तक वितरण करण्यात आले. तसेच जेष्ट पञकार देवानंद गहिले, संजय गोतरकर  तसेच पातूर तालूकाअध्यक्ष प्रविन दांडगे ,सचिव दिपक भवाने व रमेश देवकर,शेख मुन्तजीर , तसेच माजी नगरसेवक विजय गोतरकर, विद्यार्थीनी कु.सोनल काळमेघ, कु.कोमल नाकट व नागरिकांचि उपस्थिती होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.