BREAKING NEWS

Wednesday, November 16, 2016

ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथांचे आचरण हीच खरी भक्ती : ह.भ.प.श्री. निवृत्ती महाराज महाराज देशमुख – इंदुरीकर

कोंढवा :/श्री अनिल चौधरी /-




आई वडिलांची सेवा तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि संतश्रेष्ठ  तुकाराम महाराज गाथा यांची पारायणे भक्तिभावाने करा , त्यामधील विचार समजावून घ्या आणि त्याद्वारे आचरण करा तीच खरी भक्ती आहे ,तसेच जीवनातील आनंदाचे महत्व जाणून घ्या असे प्रतिपादन प.पु., समाजभूषण, समाजप्रबोधनकार ह.भ.प.श्री. निवृत्ती महाराज महाराज देशमुख – इंदुरीकर यांनी केले आहे.
 
कोंढवा येथे कै.दत्तात्रय चौधरी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मा.नगरसेवक भरत चौधरी, कोंढवा खुर्द ग्रामस्थ व चौधरी परिवाराच्या वतीने समाजभूषण इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते त्याप्रंगी ते बोलत होते.

 सोने, नाणे ,पैसा-अडका यापेक्षाही भगवंताच्या नामाला अधिक महत्व असल्याचे आणि त्या भावनेतून भक्तीने आपल्या मनात विठ्ठल साठवितो तोच खरा भक्त अशी आपली धारणा आहे.त्याच भावनेतून आज येथे मोठ्या प्रमाणावर कीर्तनासाठी आपण सहभागी झालात हि समाधानाची बाब असल्याचे ह.भ.प. इंदुरीकर महाराज स्पष्ट  केले.
 संतश्रेष्ठ तुकाराम महारज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनी विविध ग्रंथाद्वारे उभारलेल्या भक्तीच्या अविनाशी मंदिरातील तुम्ही पुण्यवंत भक्त आहात. तृप्त मनाने भगवंताच्या स्मरणात येथे राहिलात तर तुमचे कल्याण निश्चित आहे.ज्याची भूक भारी तो भिकारी या न्यायाने ज्ञानाची,अध्यात्माची भूक ठेवा आणि सतत भक्तिमार्गाचे आचरण करा, असे आवाहन ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले आहे .
    वारकरी सांप्रदयातून होत असलेले समाज सुधारण्याचे काम प्रेरणादायी आहे.  वारकारी सांप्रादाय शिस्तीला अधिक  प्राधान्य देणारे आहे. देशाने आर्थिकदृष्ट्या चांगली प्रगती केली आहे.विज्ञान,तंत्रज्ञानात आपला देश आघाडीवर आहे, उदयोग व्यवसाय आपण उत्तमप्रकारे प्रगतीच्या उच्च्स्थानावर पोहोचविले.मात्र सर्वसामान्यांना सुखसमाधान लाभण्यासाठी अध्यात्माची नितांत गरज आहे.प्रामुख्याने तरुण वर्गावर योग्य संस्कार करुण त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सांप्रादय क्षेत्राची आणि विविध ग्रंथांच्या  पारायणाची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मा.नगरसेवक भरत चौधरी यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.