चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान)-
गेल्या अनेक वर्षापासून सर्वशिक्षा अभियानात करार पद्धतिवर काम करीत असलेल्या राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांचा येत्या 13 डिसेंबर रोजी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. शासन सेवेत कायम करा ही एकच मागणी हे सर्व कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षापासून लाऊन धरत आहे. भाजप सरकारने सत्तेत आल्या बरोबर तुम्हाला कायम करू असे आश्वासन या कर्मचाऱ्यांना दिले होते. परंतु 2 वर्ष उलटुनही यांचा हाती काहीच न लागल्याने त्यांना पुन्हा अन्दोलनाचा पवित्रा घ्यावा लागला असल्याचे संघटनेने सांगितले.
शिक्षणात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी काम करीत असलेले विषय साधन व्यक्ति, समावेशित शिक्षण विशेष तज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, फिरते विशेष शिक्षक, लेखा, अभियंता असे अनेक पदे सर्वशिक्षा अभियानामधे मानधन तत्वावर 2001 पासून भरल्या गेले आहे. शाळा बाह्य मुले शाळेत दाखल करने, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, सद्या सुरु असलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातही हे करार कर्मचारी उत्कृष्ठ काम करीत असून अनेक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. अनेक जिल्ह्यात केंद्र प्रमुखाच्या जागा रिक्त असतांना त्यांची उणीव ही ह्या कर्मचाऱ्यांमधून भरून निघत आहे. शाळेच्या सर्व भौतिक सुविधे साठी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हे कर्मचारी काम करीत आहे. पण गेल्या 15 वर्षापासून सेवासमाप्तीची टांगती तलवार यांच्या डोक्यावर आहे, या 15 वर्षात अनेक कर्मच्यारी विविध कारणाने मरण पावले त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे अशा परिस्थितीत यांना शासनाचा कुठलाही आधार नाही याचा परिणाम त्यांच्या मानसिक स्वास्थावर होत आहे. आतापर्यंत कॉंग्रेस सरकार होते त्यावेळी आजचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे वेळोवेळी नेतृत्व करीत अनेक मागण्या मंजूर करुण दिल्या परंतु कायम ची मागणी ते अद्याप पूर्ण करू शकले नाही सत्तेत आल्याबरोबर लगेच तुमच्या हातात कायम चा आदेश असेल असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते त्याचेच स्मरण करुण देण्यासाठी 13 डिसेम्बर ला आमचा मोर्चा असून यात सर्वशिक्षा अभियानातील सर्व करार कर्मच्यार्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व शिक्षा अभियान करार कर्मच्यारी कृति समिती करीत आहे असे मत संघटनेच्या पदधिकार्यांनी व्यक्त केले
शांतता व शिस्तीत निघनार मोर्चा
Post a Comment