महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे कुलगुरूंचे आवाहन
अमरावती-
मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार वित्तीय साक्षरता अभियानांतर्गंत (विसाका) विद्यापीठांतर्गंत येणा-या महाविद्यालय आणि शैक्षणिक विभागातील विद्याथ्र्यांना कॅशलेस समाज निर्मितीसाठी पुढाकार घेण्याच्या हेतूने ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन विद्यापीठाद्वारा करण्यात येत आहे.
मानव संसाधन विकासमंत्री ना.श्री. प्रकाश जावडेकर यांनी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याशी केलेल्या संवादात याबाबतची पूर्ण माहिती देण्यात आली असून विद्यापीठाशी निगडीत सर्व आजी-माजी विद्याथ्र्यांना या अभियानात स्वयंसेवक म्हणून नोंदणी करता येणार आहे. यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या www.mhrd.gov.in/visaka . या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या संपूर्ण माहितीनिशी नोंद करावी लागणार आहे. दि. 7 ते 14 डिसेंबर दरम्यान ही नोंदणी चालणार असून महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसह सर्वच विद्याथ्र्यांना यात आपली नोंदणी करावी लागणार आहे. या राष्ट्रीय कार्यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यासाठी स्वत: पुढाकार घेवून अधिकाधिक विद्याथ्र्यांच्या नोंदणीचे लक्ष साधावे लागणार आहे.
नोंदणी झालेल्या विद्याथ्र्यांना दि. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान कॅशलेस व्यवहाराविषयी प्रत्यक्षिक ज्ञान देण्यासाठी विद्यापीठाद्वारे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रत्येक विद्याथ्र्यांना किमान दहा कुटूंबांना कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. दि. 20 डिसेंबर ते 12 जानेवारी, 2017 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. दि. 12 जानेवारी, 2017 रोजी प्रत्येक विद्याथ्र्यांने आपला अंतीम कार्य अहवाल छायाचित्रानिशी विद्यापीठाकडे अथवा महाविद्यालयाकडे सादर करावा लागणार आहे.
विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्याथ्र्यांना विद्यापीठ परिसरात जिल्हावार तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाचही जिल्ह्रात आयोजित शिबीरात कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण विद्यापीठाद्वारे दिल्या जाणार आहे. सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्याथ्र्यांनी कॅशलेस सोसायटी निर्मितीच्या राष्ट्रीय कार्यात स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, बी.सी.यु.डी.चे संचालक डॉ. राजेश जयपूरकर यांनी केले आहे.

Post a Comment