BREAKING NEWS

Saturday, December 10, 2016

श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन - परम पूज्य संत श्री इंद्रदेवजी महाराज करनार कथन

अचलपूर / श्री  प्रमोद नैकेले /--


श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने एका पत्रकार परिषदेत आयोजक बाबुरावजी खंदारे यांनी विस्तृत माहिती दिली.


     श्रीमद भागवत कथेचे आयोजन दिंनाक १४ डिसेंबर पासून २० डिसेंबर पर्यंत कांडली येथील ग्रामपंचायत समोरील खाडकर मैदानावर करण्यात आले आहे आयोजक बाबुराव खंदारे यांनी महाराजांबद्दल माहिती देत सांगीतले की श्रीकृष्णाच्या पवित्र लिलांनी पावन मथुरा नगरीच्या जवळ असलेल्या निर्जन अशा नागलसांजा गावात किसन व हरदेवी या ब्राम्हण दाम्पत्याचे उदरी गुरुजींनी जन्म घेतला अवघ्या तीन वर्षाचे वयात मातेच्या निधनाने ते पोरके झाल्यावर पाचव्या वर्षात ब्रम्हानंदन सरस्वती यांनी त्यांना ह्रदयस्थ केले.महाराजांनी २४ देशांची यात्रा करून एम.ए.इंग्रजी व आयुर्वेदात पिएचडी पर्यंत शिक्षण प्राप्त केले आहे आज श्री श्री १००८ महामंडलेश्वर म्हणुन ख्याती प्राप्त केली आहे.अनेक सन्मानाने ते सन्मानित झाले त्यांचे कथन अतीशय सरल असून इतर भागवत कथेपेक्षा या कथा यज्ञात एक वेगळीच अनुभूती येईल असे आयोजकांनी सांगितले यावेळी आयोजक समितीचे वनमाला खंदारे,विजय मांडळे,मिराबाई अजलसोंडे,सुहास कोंडे,मिना ढोबरे,दत्तराव डुकरे,निशा खंदारे व सदस्य उपस्थित होते.संजय अग्रवाल कार्यालय प्रमुख दै.अमरावती मंडल यांनी याप्रसंगी सोहळ्याची दैनंदिनी घटनाक्रमाची माहिती दिली तर संजय जोशी यांनी आपल्या पत्रकारीतेत भगवत गीतेच्या सुविचारांवर नित्य प्रकाश टाकला पाहिजे ज्यामुळे आयोजकांच्या भागवत कथेचे आयोजना मागचा उद्देश जोअतिशय उत्तम आहे तो साध्य होईल.आज युवाशक्ती व्यसन व वाईट सवयीने भरकटत जात आहे त्यांना जिवन जगण्याचा मुलमंत्र अशा कार्यक्रमातून प्राप्त होईल असे सांगून आयोजकांचे आभार मानले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.