नागपूर -

डॉ. झाकीर नाईक यांच्याविरुध्द कोणताच आरोप सिद्ध झालेला नाही. ते धार्मिक प्रवचन देतात, त्यांच्या संस्थेवर केलेली बंदी चुकीची आहे, अशी दर्पोक्ती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ९ डिसेंबरला केली.
इस्लामी धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालणे चुकीचे आहे. डॉ. नाईक यांच्या संस्थेला बाहेरील देशातून पैसे देण्यात आले आहेत; मात्र ते देशाविरुद्ध कोणतेच काम करत नाहीत. (अशी खोटी माहिती देऊन समाजाची दिशाभूल करणार्या अबू आझमी यांच्यावर भाजप शासनाने कठोर कारवाई करायला हवी. - संपादक) भाजपला सत्तेचा माज आला आहे. भाजप धर्माच्या नावाने देशाला तोडण्याचे काम करत आहे. आधी या देशावर मुसलमानांनी ९०० वर्षे राज्य केले आहे; मात्र मुसलमान समाजाने असे कधीच केले नाही.
Post a Comment