BREAKING NEWS

Monday, December 12, 2016

​नगरपालिका निवडणूका झाल्या नागरी सुविधा चे काय?​

श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर:-





अचलपूर नगरपालिका निवडणूका झाल्या पण जुळ्या शहरातील नागरी सुविधा चे काय? हा प्रश्न जनतेला त्रासदायक ठरत आहे.
2016 च्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या यामध्ये जनतेने आपले प्रतिनिधी निवडून दिले व नगराध्यक्ष पण निवडून दिला.या निवडणुकीत मतदारांनी विकासाचा मुद्दा प्रथमस्थानी ठेवून जुन्या अकार्यक्षम नगरसेवकांना घरचा अहेर दिला व नवीन व युवा पिढीला संधी दिली या मागे केवळ शहराचा विकास व नागरी सुविधा हाच उद्देश होता.निवडणूका होवून बरेच दिवस झाले नविन निवडून आलेले प्रतिनिधी आपल्या विजयाचे जल्लोषात मग्न आहेत तर नगराध्यक्ष आपल्या बाजूने संख्याबळ एकत्र करण्यात व्यस्त आहेत तसेच स्वीकृत सदस्यामध्ये आपली वर्णी लावण्याकरीता कार्यकर्ते गुंग आहेत.नवनिर्वाचीत पदाधिकारी,नगरसेवक व नगराध्यक्ष 27/28 डिसेंबर ला पदाच्या गोपनीयतेची शपथ घेवून कार्यभार सांभाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण नगरपालिका प्रशासन मात्र याकाळात बरखास्त होत नसून ते कार्यरत असते हे प्रशासन विसरले आहे कारण जुळ्या शहरातील नागरी सुविधा व व्यवस्था पार कोलमडून पडली आहे.स्वच्छता व घणकच-याची विल्हेवाट लावण्यात येत नसून सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसत आहे.
नाल्या तुडुंब भरून वाहत असुन रस्त्यावर घाण पाणी वाहत असतांना दिसत आहे.सध्या मुस्लिम बांधव ईद व ऊरूस शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतांना व पुढे नववर्षाचे आगमन होणार असल्याने ही प्रशासनाची उदासीनता नागरीकामध्ये तिव्र संताप निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे.शहरात डास,डुक्कर,माकड व मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट वाढलेला आहे याबाबत कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याने जनता त्रस्त झालेली आहे.शहरातील पाणीपुरवठा सुध्दा सुरळीत व सुरक्षित राहिलेला नाही ब-याच प्रभागात अपुरा व दुषीत पाणी पुरवठा होत आहे.काही ठिकाणी पाण्यात नारू सदृश्य जंत निघत आहेत.शहरातील पथदिवे सुध्दा प्रभावित झाले आहे काही भागात दिवसरात्र दिवे सुरू असतात तर महत्त्वाचे ठिकाणी रात्रीसुध्दा अंधाराचे साम्राज्य दिसत आहे.यामुळे शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तेंव्हा प्रशासनाने व नवनिर्वाचीत लोकप्रतिनिधींनी त्वरीत जनतेच्या असुवीधाकडे लक्ष देऊन त्यांना नागरी सुविधा पुरवाव्या अशी मागणी संत गाडगे महाराज तक्रार निवारण समिती तर्फे  अध्यक्ष प्रमोद नैकेले यांनी केली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.