अचलपूर:-मो अज़हरउद्दिन/--
तीन तलाक,परदा पध्दत व चार विवाह यांचा आधार घेऊन सरकार मुस्लिमांना बदनाम करण्याचे प्रयत्न करीत आहे.यामुळे न्याय करण्यापेक्षा समाजावर अन्याय होत आहे.असा आरोप मुस्लिम संघटनांनी लावत सरकारच्या या धोरणाचा निषेध केला आहे.चार विवाह हा आदेश नसून परिस्थिति नुसार केलेली व्यवस्था आहे.आदेश अथवा नियम असता तर प्रत्येक मुस्लिम बांधवांना चार पत्नी असत्या पण वास्तविकता अशी नाही.तिनवेळा तलाक म्हणून वैवाहीक संबध नष्ट करने ही प्रथा वाईट म्हणण्यापेक्षा सोपी व सरळ पध्दत आहे.परदा पध्दत हा महिलावर अन्याय नसून महिलांचा सन्मान व आदर करणे आहे.कमी कपड्यात अंगप्रर्दशन करण्यापेक्षा परदा पध्दत उत्तम आहे.सरकार महिला सुरक्षा व समान हक्काच्या नावाखाली अल्पसंख्याक घटकांची गळचेपी करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.बीफ बंदी करून काय खायचे व खाऊ नये असे निर्बंध घातले जात आहेत.इतरधर्मीय डुक्कर व इतर प्राण्यांचे मांस खातात,मुत्र प्राशन करतात त्यांच्यावर काही बंधन नाही व अल्पसंख्याक समाजावर राहणे,खाने,परिधान करने व इतर गोष्टीवर बंधन म्हणजे सरकारच्या मुस्लिम विरोधी कारवाई आहे.हे असेच चालू राहिले तर देशात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण होण्याऐवजी अशांताच निर्माण होईल त्यामुळे असे विणाकारणचे वाद निर्माण करू नये व सर्वधर्मसमभावाने सर्वांना जगण्याचा अधिकार घटनेने दिला आहे असे निवेदनात म्हटले आहे.हा होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आज अचलपूर शहरात असंख्य मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून मुकमोर्चाने तहसिल कार्यालयात जाऊन महामहीम राष्ट्रपती यांच्या मार्फत सरकारला ही मागणी करण्यात येणारे निवेदन देण्यात आले. या वेडी अचलपूरचे काजी सै गयासोद्दिन खतिब सै अबरार हुसेन.मोफ्ती मो नुरोद्दिन अबुल हसन कबिर हन्फी आदि उपस्थित होते
Post a Comment