पुण्यामध्ये गेले २० वर्ष समाजसेवेचे व्रत हाती घेऊन समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणारे, गरजू व्यक्तीसाठी वेळोवेळी धावून जाणारे व समाजाच्या हक्कांसाठी , हितासाठी सिस्टीम बरोबर लढा देणारे असे झुंजार व्यक्तीमत्व असलेले वडगांवशेरी येथील श्री महेंद्र गलांडे यांना "समाजभूषण पुरस्कार " देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार इस्लामपूर येथील सामाजिक सेवाभावी संस्था "आदर्श फाऊंडेशनच्या "नॅशनल युनिटी अॅवार्ड-२०१६" च्या अंतर्गत शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती मा प पू नंदगिरी महाराज यांच्या हस्ते पुण्यातील एस.एम.जोशी हॅाल,नवी पेठ ह्या ठिकाणी देण्यात आला.त्यावेळी संस्थेचे मार्गदर्शक प्रमोदभाऊ पेठकर हे म्हणाले की,प्रतिकूल परिस्थितीतीशी लढा देत नागरीकांच्या समस्यांवर अनेक आंदोलने यशस्वी करून आत्मविश्वासाने महेंद्र ने आपल्या क्षेत्रात आजवर चौफेर घोडदौड सुरू ठेवली आहे. एक आदर्श आणि कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्व म्हणून भावी पिढी महेंद्र चा नक्कीच आदर्श घेईल.तसेच त्यांनी महेंद्र गलांडे यांना उज्ज्वल व दिमाखदार वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नरेंद्र मोदी विचार मंचाचे अध्यक्ष प्रमोद परदेशी,ड़ाॅ अशोक शिलवंत,राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जगन्नाथ शिंदे,माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, सिनेअभिनेत्री मैथिली जावकर,विजय लोहार इ.मान्यवर उपस्थित होते.
Saturday, December 3, 2016
आदर्श फाऊंडेशन तर्फे महेंद्र गलांडे यांना समाजभूषण पुरस्कार
Posted by vidarbha on 4:00:00 PM in अनिल चौधरी पुणे :- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment