जळगाव - हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त विविध उपक्रमांद्वारे, तसेच पथनाट्य, सामाजिक संकेतस्थळे, होर्डिंग, भित्तीपत्रके, स्टिकर यांद्वारे विविध आस्थापने, संस्था, महाविद्यालये, संघटना आणि घरोघरी प्रसार करण्यात येत आहे. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून सभेच्या प्रचारासंदर्भातील समितीच्या जळगाव फेसबूक पेजची एकूण रीच संख्या एका सप्ताहात ३ लाखांहून अधिक झालेली आहे. तसेच व्हॉट्स अॅपद्वारे सभेचा विषय ६५ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोचला आहे.
![]() |
पथनाट्य सादर करतांना कार्यकर्ते |
यानंतर समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, भ्रष्ट आणि अन्यायी समाजव्यवस्थेच्या विरुद्ध युवकांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. तसेच केवळ स्वार्थी विचार न ठेवता समाजाभिमुख उपक्रमांत सहभागी व्हायला हवे. सक्षम आणि चारित्र्यवान युवा पिढीच राष्ट्र घडवू शकते. यासाठी ‘युवतींनीही स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यायला हवे’, असे ते म्हणाले. यानंतर प्राचार्यांना ३१ डिसेंबरनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन देण्यात आले.
Post a Comment