BREAKING NEWS

Sunday, December 4, 2016

शहरातील राष्ट्रीयकृत बँकांचे "एटीएम' बनले "एटीएमबी' ग्राहकांना होतोय त्रास

चांदुर रेल्वे- (शहेजाद  खान)-
Displaying IMG_२०१६१२०४_१५५३०५.JPG
पैशाचा पुरवठा कमी, आणि लोकांची मागणी जास्त यामुळे शहरातील बँकामध्ये दररोज पैसे
मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहे. बँकेत आलेल्या ग्राहकांना तासनतास ताटकळत उभारावे लागत आहे. याव्यतीरीक्त पैसे काढण्यासाठी शहरात चार राष्ट्रीयकृत बँकाचे एटीएम असुन चारही एटीएम गेल्या आठ दिवसांपासुन असल्याने ग्राहकांना अजुनच त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये सर्वांत जास्त त्रास पेंशनधारक वृध्दांना होत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे नागरिकांना केव्हाही पैसे मिळावेत
म्हणून सुरू केलेली शहरातील विविध बॅंकांची एनी टाईम मनी (एटीएम) मशीन आता एनी टाईम मशीन बंद (एटीएमबी) झाली आहेत.
     केंद्र सरकारने हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने देशभरातील आर्थिक व्यवहारांसह दैनंदिन जनजीवनावरही त्याचे पडसाद उमटले आहे.  बँकेमध्ये नोटा जमा करण्यासाठी व काढण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. खात्यातील पैसे काढण्यासाठी शहरात सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक या बँकेंचे एटीएम आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासुन या राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएममध्ये पैशांचा ठणठणाट जाणवत असुन एटीएम पुर्णत: बंद अवस्थेत आहे. अनेक एटीएम बंद असल्याने
नागरिकांची गैरसोय होत आहे. एकंदरीत पैशांअभावी अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकेतील गर्दी कमी करण्यासाठी व ग्राहकांना होत असलेल्या त्रासापासुन मुक्त करण्यासाठी एटीएममध्ये तरी पुरेसे पैसे ठेवून सेवा द्यावी, अशी
मागणी जोर धरत आहे..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.