BREAKING NEWS

Saturday, February 4, 2017

वाद सामंजस्याने मिटविण्याचे लोक न्यायालय प्रभावी माध्यम - पी.एस.इंगळे ** लोक न्यायालयामुळे वेळ व पैशाची होते बचत - 11 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन **

चंद्रपूर-

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय यांचे सुचनेनुसार संपूर्ण देशामध्ये त्याच प्रमाणे चंद्रपूर जिल्हयामध्ये सुध्दा 11 फेब्रुवारी 2017 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयात एकाच दिवशी घेण्यात येणा-या या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोडीयोग्य सर्व दिवाणी दावे, फौजदारी खटले, कौटूंबीक वादाची प्रकरणे, विमा कंपन्यांची व बँकाची प्रकरणे व भुसंपादन दावे इत्यादी प्रकारची तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटीगेशन) बँकांची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, पाणी आणि विद्युत देयकांची प्रकरणे ठेवण्यात येणार आहे.
आतापर्यंत संपूर्ण महाराष्टातून 27 लाखापेक्षा जास्त प्रकरणे महालोक अदालतीच्या, राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आलेल आहेत. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हयामध्येही लोक न्यायालयाच्या माध्यमातून पक्षकारांनी अनेक आपआपले वाद कायमचे संपुष्टात आणलेले आहेत. लोक न्यायालयामध्ये वाद मिटविल्यास संबंधित पक्षकरांच्या पैशाची व वेळेची बचत होवून दोन्ही पक्षकारांचे संबंध चांगले राहू शकतात. त्यामुळे ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत आहेत किंवा ज्या पक्षकारांची दावापूर्व (प्रिलिटीगेशन) प्रकरणे आहेत. अशा सर्वांनी त्यांची प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सामजस्यांने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात यावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूरचे अध्यक्ष एन.आर.बोरकर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूरचे सचिव पी.एस.इंगळे यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.