जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याबैठकीला निवडणूक निरिक्षक भंडाराचे अप्पर जिल्हाीधिकारी प्रदिप डांगे, वर्धेचे अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्हाधिकारी निव्डाणूक एन.के.लोणकर, उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेमध्यें पारदर्शकता ठेवण्यासाठी ई.व्हीे.एम. तपासणी, मॉक पोल यासारख्या प्रक्रिया राबवितांना राजकीय पक्ष आणि उमेदवारांना नोटीस देवून आमंत्रित करावे. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. प्रचारासाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी सभेच्या मैदानाचे नियोजन करावे. निवडणूक काळात कायदा व सुव्यरवस्था कायम राहण्यासाठी शांतता समितीची बैठक प्रत्ये क तालुक्या मध्ये घेण्याात यावी, अशा सुचना श्री. पुलकुंडवार यांनी दिल्यात.
स्थिर निगरानी पथकाने प्रत्येक नाक्यावर वाहनांची तपासणी करुन दारु आणि पैसा याची वाहतुक करणा-यांवर कारवाई करावी. तसेच निवडणूक खर्च समिती आणि चित्रीकरण पथकाने समन्व याने काम करुन उमेदवाराच्या खर्चाचा योग्या हिशोब ठेवावा, अशा सूचना निवडणूक निरिक्षक प्रदिप डांगे यांनी दिल्यात.
मतमोजणी कक्ष आणि स्ट्रॉं ग रुम यासाठी योग्य ठिकाणाची निवड करावी. मतदान केंद्राबाहेर मतदानाच्या् दिवशी बी.एल.ओ. यांना मतदार यादया घेवून बसण्याची व्यवस्था करावी. तसेच मतदारांना मतदान चिठ्ठी घरपोच देण्यात यावी अशाही सूचना श्री. डांगे यांनी यावेळी दिल्यात.
बैठकीला जिल्ह्यातील आठही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा पोलिस उपअधिक्षक(गृह) आर.जे. किल्लेकर, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी उपस्थित होते.
Post a Comment