चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी शहरातील जेष्ठ पत्रकार युसुफ खान यांची निवड करण्यात आली आहे.
अमरावती येथील हॉटेल राधेय येथे शनिवारी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय विशेष बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने हे होते तर विशेष अतिथी म्हणुन प्रदेशाध्यक्ष जळगाव येथील बापुसाहेब देशमुख, केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसुधनजी कुलथे, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक पवार, प्रदेश उपाध्यक्ष दशरथ जाधव, प्रकाश नागरे, प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, विदर्भ अध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदेश संघटक शफीक शेख, जेष्ठ पत्रकार वसंतराव कुळकर्णी, अमरावती जिल्हाध्यक्ष कदम, जळगाव जिल्हाध्यक्ष भगवान सोनार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसुधनजी कुलथे यांनी स्थानिक पत्रकार युसुफ खान यांची अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. सध्या पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांच्या इतर समस्या, पत्रकारांचे संघटन वाढविणे, ग्रामिण पत्रकारांना अधिस्विकृतीचा लाभ मिळणे अशा एक ना अनेक समस्या पत्रकारांच्या असुन या करीता अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटना संपुर्ण महाराष्ट्रात जोमाने कार्य करीत आहे. या संघटनेव्दारा अनेक पत्रकारांना न्याय मिळवून दिल्या जात असुन लोगोपयोगी कार्य ही संघटना सतत करीत आहे. पत्रकारांचे मागील वर्षी राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशन शेगाव येथे पार पडले. यानंतर आता जळगाव (खांदेश) येथे पत्रकांचे राज्यस्तरीय अधिवेशन १६ एप्रीलला होत असुन या ठिकाणी अनेक मंत्र्यासह संपादक मंडळी आदी प्रमुख वक्ते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या संघटनेत सातत्याने कार्य करणाऱ्या पत्रकारांची दखल घेवुन त्यांचा मान त्यांना दिला जातो. म्हणुनच स्थानिक पत्रकार युसुफ खान यासीन खान यांची अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आलेली आहे.
युसुफ खान यांनी यापुर्वी या पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्षपद, जिल्हाध्यक्षपद, विदर्भ कार्यकारीणी सदस्यपद भुषविले आहे. आता त्यांची विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे जेष्ठ पत्रकार प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, धिरज नेवारे, सचिव प्रा. रविंद्र मेंढे, कोषाध्यक्ष मनिष खुने, जिल्हा निरीक्षक बाळासाहेब सोरगिवकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल गवळी, संजय मोटवानी, विवेक राऊत, अभिजीत तिवारी, मंगेश बोबडे, इरफान पठान, मंगेश बोबडे, शहेजाद खान, मधुकर बावने, अमर घटारे, प्रा. सुधिर तायडे, विनय गोटेफोडे, राहुल देशमुख, प्रा. प्रसेनजित तेलंग, अजय गावंडे, हनुमंत मेश्राम, राजेश सराफी आदींनी कौतुक केले आहे.
Post a Comment