BREAKING NEWS

Sunday, March 12, 2017

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे, सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांचा वाशिम दौरा

महेंद्र महाजन  / वाशिम  : 


महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे, सदस्य (विधी) न्यायमूर्ती सी. एल. थूल हे दि. 13 व 14 मार्च 2017 रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

दि. 13 मार्च 2017 रोजी सायंकाळी 5.20 वाजता नागपूर येथून कारने वाशिमकडे प्रयाण. रात्री 8 वाजता वाशिम सर्किट हाऊस येथे आगमन व मुक्काम. दि. 14 मार्च 2017 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे समवेत मोटेगाव (ता. रिसोड) कडे प्रयाण. संगिता मोरे मृत्यू प्रकरणी घटनास्थळाला भेट व चौकशी अधिकारी यांच्या समवेत चर्चा व मार्गदर्शन. दुपारी वाशिम सर्किट हाऊस येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व तपासणी अधिकारी यांच्या समवेत चर्चा व मार्गदर्शन. दुपारी 3 वाजता कारने नागपूरकडे प्रयाण.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.