वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे शिवसेनेच्या वतीन शेलू फाटा अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला .
शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे . नाफेड मार्फत तूर खरेदी-भेदभाव न करता झालीच पाहिजे आदी घोषणा देत शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले .खासदार भावनताई गवळी यांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्हाभर रास्ता रोको करण्यात आला .अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या दूरवर रांगा च्या रांगा लागल्या .वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांना अटक केली. मालेगाव पोलीस स्टेशनला बसवून नंतर सुटका करण्यात आली.आंदोलना मध्ये तालुका प्रमुख संतोष सुरडकर,शहर प्रमुख तथा नगर सेवक संतोष जोशी,ज्ञानबा सावळे,किरण चांगडे,भगवान बोरकर,योगेश काटेकर,व्येंकटेश कंकाळ,युवा सेना शहर प्रमुख अभि घुगे,गजानन बोरचाटे,गोपाल पवार,गणेश सरनाईक आधी कार्यकर्त्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
Post a Comment