Sunday, March 12, 2017
भागवत हजबे यांची शिवसेना उकळीपेन उपसर्कल प्रमुखपदी नियुक्ती
Posted by vidarbha on 3:55:00 PM in महेन्द्र महाजन / वाशीम - | Comments : 0
महेन्द्र महाजन / वाशीम -
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच वाशीम जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुळकर, खासदार भावनाताई गवळी, जिल्हा प्रमुख राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख रामदास मते पाटील यांनी वाशीम तालुक्यातील उकळीपेन सर्कलमध्ये शिवसेनेचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते भागवत तुकाराम हजबे यांची उकळीपेन उपसर्कल प्रमुखपदी नियुक्ती करुन त्यांच्यावर पदाचा कार्यभार सोपविला. खासदारांच्या जनशिक्षण संस्थान या जनसंपर्क कार्यालयावर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, निलेश पंेंढारकर, उपतालुका प्रमुख गजानन जैताडे यांच्या हस्ते भागवत हजबे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी विठ्ठलराव चौधरी, निरंजन पाटील गावंडे प्रल्हादराव गावंडे, विनोद महल्ले, अनिल चव्हाण, दत्तराव भुसारे, भागवतराव हजबे, दत्तराव मोरे, वैजनाथ आखाडे, विश्वनाथ मुठाळ, उत्तम गोटे, कैलासराव चिपडे, नितीन जैताडे, रुपेश जैताडे, विलासराव जैताडे, कैलास महल्ले, गणेश जैताडे, महादेव खोडके, केशव खोडके, गजानन भोयर, किशोर हजबे, ङ्गुलचंद सिंगरोल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हयातील तालुका कार्यक्षेत्रात वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पक्षशिस्तीचे पालन करुन जनतेच्या हितासाठी नियमित उत्कृष्ट कार्य करावे असे नियुक्तीपत्रात वरिष्ठांनी नमूद केले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment