एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्पाच्या वतीने केमिस्ट भवनात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त महिलांचा सत्कार व महापुरूषांच्या वेशभुषा, रांगोळी स्पर्धा, फुलसजावट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्री मंचाच्या जिल्हाध्यक्ष किरण गिर्हे होत्या. उद्घाटक म्हणून पालिका सभापती कुसुम गोरे यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक सुनिता गोरे, माजी पालिका सदस्य आशाताई खडके, मोनीका महाले, सत्यसाई समितीचे जिल्हाध्यक्ष शकुंतला जाधव, शोभा पडघान, सांगळे, रेणुका भांदुर्गे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सीडीपीओ डी. डी. इंगळे यांनी केले. वेशभुषा स्पर्धेत जिजाऊच्या भुमिकेत सानिका प्रकाश बोरकर हिने प्रथम पारितोषिक मिळविले. रंगोळी स्पर्धेत आकांक्षा पानझाडे हिने प्रथम पारितोषिक मिळविले. तर दुसरे पारितोषिक दिपमाला कल्ले, फुलसजावटमध्ये सानिका बोरकर यांनी बक्षीसे मिळविले. महिला दिनानिमित्त जनजागृती, महिलांचा सन्मान, बेटीबचाव, बेटी पढाव या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रियंका बोरकर यांनी केले. वैशाली बुंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्यसेविका श्रीमती सावदेकर, गांजरे, घुगे, श्री. राठोड व सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment