अचलपूर तालुक्यातील गाव बोपापूर नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते.येथील युवापिढी सातत्याने आपल्या गावात सामाजिक सलोखा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.
याच अनुषंगाने नुकत्याच जागतिक महिला दिनानिमीत्त सावित्रीबाई फुले स्मृति दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले तसेच साई एकाडमीचे प्रमुख नितिन दादा आस्टूकार यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यात आली कारण ते गावामध्ये बरेच वर्षापासून विनामूल्य युवकांना मार्गदर्शन करीत आहेत ही पुस्तके त्यांना आर्ट ऑफ़ लिविंग च्या समुहाकडून देण्यात आली.तसेच सरमसपूरा पोलिसी स्टेशनचे ठानेदार अभिजित अहिरराव सहा.पोलीस निरीक्षक रवि रेवतकर यांनी पोलिस भरतीबाबत मार्गदर्शन केले व त्यानी गावत दारूबंदी करून व्यसनाधीनतेकडे जाणा-या युवाशक्ती ला योग्य मार्ग दाखवला तसेच उध्वस्त होणारे संसार वागण्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ़ लिविंग ग्रुप बोपापुर यांनी व सहकार्य सर्व ग्रामवासीयांनी केले
Post a Comment