अचलपूर सुलतानपूरा येथील अनिल उर्फ बबल्या या युवकाने गळफास लावून आपली जिवन यात्रा संपवली.
प्राप्त माहितीनुसार सुलतानपूरा येथील अनिल उर्फ बबल्या रामदास कामत श्रीराव(35) याचे कडे ग्रामशक्ती फुलट्रोन इंडिया या फायनान्स कंपनीचे कर्ज होते.कर्जावर त्याने पाच म्हशी घेतल्या होत्या हातमजुरी करणा-या अनिल ला हे कर्ज फेडण्यास असमर्थ असल्यामुळे त्याने या म्हशी रियाज कुरेशी जोगीपुरा याला विकल्या परंतू तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत असून पैसे मागितल्यावर शिवीगाळ करायचा याच दरम्यान अनिलने रियाजची चाळीस पोतै तुर सुध्दा भाड्याचे थ्रेशर घेवून काढून दिली.त्याची मजुरी सुध्दा दिली नाही ही तुर त्याने याच परिसरातील व्यापा-याला विकल्याचे तो व्यापारी सांगत आहे.रियाजचा बैल कामाकरीता विकत घेतला त्याची पावती नाही बैल नेण्याची व जिवे मारण्याची धमकी देत त्याने ड्रीम होंडा ची मोटारसायकल सुध्दा घेवून गेल्याचे मृत्यू पूर्व लेखी जबानीत लिहिल्याची चिठ्ठी अनिलच्या खीशात पोलीसला सापडली.ही मोटारसायकल मुस्तू नामक व्यक्तीला त्याने दिली असेही चिठ्ठीत नमूद केले आहे.काल रात्री रियाज घरी येऊन धमकावून गेल्याचे आसपासच्या लोकांनी सांगितले.
Post a Comment