रिसोड येथील चांदनी चौक स्थित गुलशने आसिया प्रि प्रायमरी स्कूल चा वार्षिक स्नेह संमेलन ता ११ मार्च रोजी रात्रि १० वा रंगारंग कार्यक्रमाने संपन्न झाला.
पठान पुरा स्थित कदम लेआउट मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात लहान मुलांनि शाळेतिल शाहिन परवीन,बुशरा तानियाल,उजमा परवीन या शिक्षीकांनी कोरिओग्राफी केलेल्या देशभक्ति,सामाजिक, बेटी बचाव बेटी पढाव ,देश का सिपाही,स्वच्छता अभियान, सास्कृतिक विषयावर उत्कृष्ट कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकत खुप वाहवाही लुटली.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी नाजेर खान हे होते तर प्रमुख उपस्थितित
बिलाल खान,एड तौसीफ शेख,मो आरिफ,तारेक खान,मो जुनेद,डॉ इद्रिस,अब्दुल वहीद मंच वर उपस्थित होते.
कार्यक्रमाचि सुरवात कुरान ग्रंथच्या श्लोकाने रेहान अहमद या लहान मुलाने केलि.कार्यक्रमाला मंचावरील उपस्थित मान्यवरांचे शाला समितिच्या वतिने शाल फूल देउन स्वागत करण्यात आले.मुली शिकल्या पाहीजे व मुली जगल्या पाहिजे, आपल घर व परिसर स्वच्छ ठेवल पाहिजे,उघड्यावर शौचास न जाता शौचालयचा वापर करावा,अतिथिंचे मान सन्मान राखावे,आपल्या पाल्यांचा आदर करावा,देशसेवेसाठी तयार रहावे आदि अन्य विषयावर नाटीका सादर करत लहान मुलांनी उपस्थितांना मोहित केले.कार्यक्रम अंतर्गत शहरातील विवीध प्राथमिक शाळात उत्कृष्ट काम करना-या शिक्षकांचे शाल व मानचिन्ह देउन सत्कार शाला व्यवस्थापन समिति ने केले यामध्ये अब्दुल रउफ,शगुफ्ता अंजम,मो मुख्तार,वसिम खान,मो.अकबर,असदउल्ला खान,वलायत अलि यांचा समावेश आहे.कार्यक्रमाचे संचालन इरशाद अहेमद यांनी केले आभार सिकंदर खान यांनी मानले.
कार्यक्रमाला इस समय एड गुलाम कुरैशी,इरफान कुरैशी,शेख जुल्फेकार,नजिर हैदर,सफदर खान,अनिस खान,महेबूब अली,अब्दुल दयार,गजनफर खान,एवाज खान,फारुक पेंटर,अबरार खान आदी प्रतिष्ठित नागरिक व पालक तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शाला समिती सदस्य व पठान पुरातील युवकांनी परिश्रम केले.
Post a Comment