Wednesday, March 8, 2017
रविवारी स्मशान होलीकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
Posted by vidarbha on 4:55:00 PM in महेन्द्र महाजन -वाशीम : | Comments : 0
महेन्द्र महाजन -वाशीम :
सामाजीक कार्यात सदैव अग्र्रेसर असलेल्या संकल्प मल्टीपर्पज फाऊडेशनचा वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार, 12 मार्चला दुपारी 1 वाजता स्थानिक मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये ‘स्मशान होलीकोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे सलग अकरावे वर्ष आहे. त्यानुसार स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. व शेवटी तंबाखु, बिडी, सिगारेट, प्लॉस्टीक कॅरीबॅग व गांजर गवताची होळी करुन पर्यावरणपुरक होलीकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अशोक हेडा, जेष्ठ समाजसेवक डॉ. हरिष बाहेती, न.प. उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, न.प. सभापती राहुल तुपसांडे, मानवसेवा ङ्गाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव अग्रवाल व विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील. तरी या होलीकोत्सव कार्यक्रमाला समाजसेवक व स्वच्छता प्रेमी नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संकल्प मल्टीपर्पज ङ्गाऊंडेशनचे अध्यक्ष सुशील भिमजीयाणी यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment