स्थानिक न.प. जवळील महावीर भवन येथे आयोजीत प्रवचनात त्यांनी वरील मार्गदर्शन केले. यावेळी मुनीश्री शिवदत्त सागर महाराज, एलक सुदत्तसागर महाराज, क्ष्ाुल्लक तत्वसागर महाराज, चंद्रदत्तसागर महाराज हे मंचावर उपस्थित होते. उपाध्याय निर्भयसागरजी महाराज यांनी पुढे सांगीतले की, आज आम्ही वेळेला महत्व देत नाही. जन्म आणि मृत्यू जीवनात अटळ आहे. त्यामुळे मानवी जीवनाच्या कल्याणाकरीता आपण जास्तीत जास्त पुण्यकार्य करावे. संतांना भिंतीवर नव्हे तर आपल्या ह्दयात जतन करावे. व्देष, मोह, माया, क्रोध यांना जीवनात स्थान देवू नये. भविष्याची चिंता न करता वर्तमान जीवन जगा. जो वर्तमानात जगतो तो पुढे जावून वर्धमान बनतो. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत निर्भयसागर पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी मंचावर रमेशचंद्र बज, विनोद गडेकर, माणिकचंद बज, जितेंद्र छाबडा, प्रमोद पाटणी, रवि बज, सचिन गोधा, प्रकाशचंद गोधा, प्रमोद पाटणी, प्रविण पाटणी, श्रीनिक भुरे व मान्यवरांची उपस्थिती होती. सकल जैन समाजाच्या वतीने उपाध्याय निर्भयसागरजी महाराज यांना वाशीम येथे चातुर्मास करण्याची विनंती करण्यात आली. प्रवचनाला मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते.
Wednesday, March 8, 2017
संताचे विचार आचरणात आणल्यास जीवनाचे कल्याण - निर्भयसागरजी महाराज
Posted by vidarbha on 4:53:00 PM in महेंद्र महाजन /वाशिम - | Comments : 0
महेंद्र महाजन /वाशिम -
आज धार्मिकतेकडे मोठ्या प्रमाणात ओघ वाढत आहे. संताच्या प्रवचनाला लाखोचा जनसमुदाय उपस्थित राहतो. संत हे सर्वाचे कल्याणाकरीता कार्य करीत असतात. समाजाला, देशाला उपदेश देण्याचे व नविन दिशा दाखविण्याचे कार्य संत करीत आहेत. मात्र लोक प्रवचनात येतात. संताचे विचार एैकतात. मात्र त्याचे अनुकरण करत नाहीत. मागे पाठ पुढे सपाट अशी वृत्ती वाढत असल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत. जर प्रत्येकाने संताचे विचार आचरणात आणल्यास त्यांच्या जीवनाचे कल्याण होते, असे प्रतिपादन उपाध्याय श्री निर्भयसागरजी महाराज यांनी व्यक्त केले.
स्थानिक न.प. जवळील महावीर भवन येथे आयोजीत प्रवचनात त्यांनी वरील मार्गदर्शन केले. यावेळी मुनीश्री शिवदत्त सागर महाराज, एलक सुदत्तसागर महाराज, क्ष्ाुल्लक तत्वसागर महाराज, चंद्रदत्तसागर महाराज हे मंचावर उपस्थित होते. उपाध्याय निर्भयसागरजी महाराज यांनी पुढे सांगीतले की, आज आम्ही वेळेला महत्व देत नाही. जन्म आणि मृत्यू जीवनात अटळ आहे. त्यामुळे मानवी जीवनाच्या कल्याणाकरीता आपण जास्तीत जास्त पुण्यकार्य करावे. संतांना भिंतीवर नव्हे तर आपल्या ह्दयात जतन करावे. व्देष, मोह, माया, क्रोध यांना जीवनात स्थान देवू नये. भविष्याची चिंता न करता वर्तमान जीवन जगा. जो वर्तमानात जगतो तो पुढे जावून वर्धमान बनतो. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत निर्भयसागर पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी मंचावर रमेशचंद्र बज, विनोद गडेकर, माणिकचंद बज, जितेंद्र छाबडा, प्रमोद पाटणी, रवि बज, सचिन गोधा, प्रकाशचंद गोधा, प्रमोद पाटणी, प्रविण पाटणी, श्रीनिक भुरे व मान्यवरांची उपस्थिती होती. सकल जैन समाजाच्या वतीने उपाध्याय निर्भयसागरजी महाराज यांना वाशीम येथे चातुर्मास करण्याची विनंती करण्यात आली. प्रवचनाला मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते.
स्थानिक न.प. जवळील महावीर भवन येथे आयोजीत प्रवचनात त्यांनी वरील मार्गदर्शन केले. यावेळी मुनीश्री शिवदत्त सागर महाराज, एलक सुदत्तसागर महाराज, क्ष्ाुल्लक तत्वसागर महाराज, चंद्रदत्तसागर महाराज हे मंचावर उपस्थित होते. उपाध्याय निर्भयसागरजी महाराज यांनी पुढे सांगीतले की, आज आम्ही वेळेला महत्व देत नाही. जन्म आणि मृत्यू जीवनात अटळ आहे. त्यामुळे मानवी जीवनाच्या कल्याणाकरीता आपण जास्तीत जास्त पुण्यकार्य करावे. संतांना भिंतीवर नव्हे तर आपल्या ह्दयात जतन करावे. व्देष, मोह, माया, क्रोध यांना जीवनात स्थान देवू नये. भविष्याची चिंता न करता वर्तमान जीवन जगा. जो वर्तमानात जगतो तो पुढे जावून वर्धमान बनतो. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत निर्भयसागर पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी मंचावर रमेशचंद्र बज, विनोद गडेकर, माणिकचंद बज, जितेंद्र छाबडा, प्रमोद पाटणी, रवि बज, सचिन गोधा, प्रकाशचंद गोधा, प्रमोद पाटणी, प्रविण पाटणी, श्रीनिक भुरे व मान्यवरांची उपस्थिती होती. सकल जैन समाजाच्या वतीने उपाध्याय निर्भयसागरजी महाराज यांना वाशीम येथे चातुर्मास करण्याची विनंती करण्यात आली. प्रवचनाला मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment