निवेदनात नमूद केले आहे की, अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8 मार्च पासून नाफेड अंतर्गत शेतकर्यांची तुर खरेदी केली असून त्यामुळे शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्यांना होणारा हा त्रास लक्षात घेता अनसिंग उपबाजार समितीमध्ये लवकरात लवकर नाफेड अंतर्गत शेतकर्यांकडून तुर खरेदी सुरु करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना शेतकरी बांधवांसोबत शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, खरेदी विक्रीचे संचालक पांडूरंग पांढरे, सर्कलप्रमुख बालु माल, दिलीप जोगी, निलेश पेंढारकर, गुलाबराव बेंद्रे, मोतीराम मोटे, मुनाराव मारकंड, दिपक इढोळे, दत्ता निरगुडे यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकर्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर असंख्य शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Wednesday, March 8, 2017
नाफेड तुर खरेदी सुरु करण्यासाठी शिवसेना आक्रमक जिल्हाधिकार्यांना निवेदन : तीव्र आंदोलनाचा इशारा
Posted by vidarbha on 4:51:00 PM in महेंद्र महाजन / वाशिम - | Comments : 0
महेंद्र महाजन / वाशिम -
तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनसिंग उपबाजार समितीमध्ये नाफेड अंतर्गत शेतकर्यांची तुर खरेदी करणे बंद असल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून अनसिंग उपबाजार समितीमध्ये लवकरात लवकर शेतकर्यांची तुर खरेदी करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात शेतकरी बांधव व शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात सोमवार, 6 मार्च रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8 मार्च पासून नाफेड अंतर्गत शेतकर्यांची तुर खरेदी केली असून त्यामुळे शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्यांना होणारा हा त्रास लक्षात घेता अनसिंग उपबाजार समितीमध्ये लवकरात लवकर नाफेड अंतर्गत शेतकर्यांकडून तुर खरेदी सुरु करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना शेतकरी बांधवांसोबत शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, खरेदी विक्रीचे संचालक पांडूरंग पांढरे, सर्कलप्रमुख बालु माल, दिलीप जोगी, निलेश पेंढारकर, गुलाबराव बेंद्रे, मोतीराम मोटे, मुनाराव मारकंड, दिपक इढोळे, दत्ता निरगुडे यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकर्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर असंख्य शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
निवेदनात नमूद केले आहे की, अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8 मार्च पासून नाफेड अंतर्गत शेतकर्यांची तुर खरेदी केली असून त्यामुळे शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्यांना होणारा हा त्रास लक्षात घेता अनसिंग उपबाजार समितीमध्ये लवकरात लवकर नाफेड अंतर्गत शेतकर्यांकडून तुर खरेदी सुरु करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना शेतकरी बांधवांसोबत शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, खरेदी विक्रीचे संचालक पांडूरंग पांढरे, सर्कलप्रमुख बालु माल, दिलीप जोगी, निलेश पेंढारकर, गुलाबराव बेंद्रे, मोतीराम मोटे, मुनाराव मारकंड, दिपक इढोळे, दत्ता निरगुडे यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकर्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर असंख्य शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment