महेंद्र महाजन / वाशिम -
येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील कृषी कन्या महिला बचत गटाला दूध डेअरी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. कृषी समृद्धि प्रकल्पाचे रमेश बादाडे, ग्राम केकतउमरा येथील सरपंच विनोद नेतनस्कर यांच्या उपस्थितीत सोमवार, 6 मार्च रोजी पाटणी कॉम्प्लेक्स स्थित कृषी समृध्दी कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात सदर महिला बचत गटाला लाभ देण्यात आला. या लाभामध्ये प्रत्येक महिलेला विस लीटरची एक कॅटली, मोठे चार टोपले व लहान चार टोपले, एक स्टील बकेट एक दहा लीटरची कॅटली, दूध मोजमाप व कल्चर साहित्य वाटप करण्यात आले. हा लाभ सदर महिला बचत गटाला मिळवून देण्यासाठी कृषी समृद्धि ग्राम विकास समितीचे सचिव प्रविण पट्टेबहादुर व अध्यक्ष गजानन घोडे यांनी कृषी समृद्धि प्रकल्पाला व संबधित यंत्रणेला पाठपुरावा करुन हे दूध डेरीचे साहित्य आपल्या गावांत खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाला कृषी समृद्धि प्रकल्पाचे निखिल बळी, मदन श्रीखंडे यांच्यासह कृषी कन्या महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या
Wednesday, March 8, 2017
कृषी समृद्धि प्रकल्पाच्या वतीने मोफत दूध डेअरीचे साहित्य वाटप - कृषी कन्या महिला बचत गटाला मिळाला लाभ
Posted by vidarbha on 4:50:00 PM in महेंद्र महाजन / वाशिम - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment