लातूर - (शहेजाद खान)
धर्मनिरपेक्ष असलेल्या हिंदुस्थानला
मी कधीही हिंदू राष्ट्र बनु देणार नाही असं वक्तव्य अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. लातूरमध्ये आयोजित सभेत बोलत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपावरही सडकून
टीका केली. काँग्रेसचं सेक्युलर तर भाजपाचं राष्ट्रवादाचं दुकान मी
बंद करणार, असल्याचा घणाघात असदुद्दीन ओवेसींनी केला आहे.
असदुद्दीन ओवेसींनी भाजपावर निशाणा साधताना 'भारतात हजारो जाती धर्माचे लोक राहतात. भारतासारखं राष्ट्र जगात कुठेही
मिळणार नाही. त्यामुळे भारताला एका धर्माचं राष्ट्र कधीच होऊ देणार नाही', असं म्हटलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम, महाराष्ट्र
विकास आघाडी, शेतकरी संघटना
यांनी एकत्र येत परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे.
Post a Comment