सिरोंचा / विशेष प्रतिनिधी /-
पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरुन कोणतीही कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिरोंचा येथील पोलिस उपनिरीक्षक श्री गोविंद विश्वास दाभाडे(३५) व हवालदार श्री सुरेश संती पेंदाम यांना रंगेहाथ पकडून अटक केली. आज सायंकाळी सापळा रचला असता पोलिस उपनिरीक्षक श्री गोविंद दाभाडे याने हवालदार सुरेश पेंदाम याच्यामार्फत तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यामुळेACB ने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. ACB विभागाचे पोलिस अधीक्षक सर्व श्री महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, मिलिंद गेडाम, गणेश वासेकर, महेश कुकुडकार, सोनल आत्राम, घनश्याम वडेट्टीवार ,रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, यांनी ही कारवाई केली.
Punish him...
ReplyDelete