Wednesday, March 8, 2017
जागतीक महिला दिनानिमित्त -जानकीनगर येथे मोटरसायकल रॅलीचे पुष्पवृष्टीने स्वागत
Posted by vidarbha on 4:59:00 PM in महेंद्र महाजन / वाशिम - | Comments : 0
महेंद्र महाजन / वाशिम -
जिल्हा प्रशासन, जि.प. महिला व बालकल्याण विभाग, पोलीस प्रशासन यांच्या वतीने जागतीक महिला दिनानिमित्त आज शहरातुन भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सदर रॅलीचे स्थानिक जानकीनगर येथे सामाजीक कार्यकर्त्या ऍड. सौ. भारती सोमाणी व सौ. स्मिताताई दहात्रे यांच्या नेतृत्वात पुष्पवृष्टीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सजविलेल्या रथात विराजमान असलेल्या जि.प. महिला व बालकल्याण सभापती यमुनाताई जाधव यांचा सत्कार सौ. भारती सोमाणी यांच्या हस्ते करण्यात आला. सोबतच रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment