BREAKING NEWS

Tuesday, March 7, 2017

अचलपूर परतवाडा शहरात नगरपालिकेची थकीत मालमत्ता कर वसुली ची धडक कारवाई सुरू.परतवाडा-अचलपूर मध्ये २-२ प्रतिष्ठान सील.

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-


सर्वच शहरवासीयांना वाटते की सुंदर रस्ते,भुयारी गटार,स्वच्छता व पथदिवे या सुविधा स्थानीक स्वराज्य संस्थेने दिल्या पाहिजेत परंतू ह्या सुविधा पुरविण्याकरीता नगरपालिकेला आवश्यक विकास निधी ज्या मार्गाने गोळा होतो त्यापैकी एक मार्ग म्हणजे कर हे जणू आपण विसरलो की काय असे वाटते.अधिकारा सोबत कर्तव्य सुध्दा महत्त्वाचे आहे.बरेच वेळा असे लक्षात येते की कर भरला नाही तर काय होते परंतू स्थानीक स्वराज्य संस्था किंवा शासकीय यंत्रणा कुचकामी नाही हा प्रत्यय काही दिवसापासून अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरात पाहायला मिळत आहे.


      अचलपूर नगरपालिका करवसुली विभागातर्फे थकीत करवसुली करिता धडक मोहीम राबवली जात आहे.पोलीस संरक्षण घेऊन करविभागाच्या पथकाने थकीत करधारकांच्या मालमत्ता सील करन्याची मोहीम सुरु झाली आहे.परतवाडा शहरात श्रीकृष्ण ज्वेलरी व आर्ट व आर.के.टेलर या दोन प्रतिष्ठानांना तर अचलपूर देवळी येथे रवींद्र ज्वेलरी व गजानन महाराज शाँप या दुकानांना आज ७ मार्च रोजी अंतिम नोटीस बजावून मुदत संपल्यामुळे सील करण्यात आले अचलपूर मधील या दोन मालमत्तेवर अनुक्रमे २२००० व ३६००० असे एकूण ५८००० रुपये थकीत करापोटी स्थानीक स्वराज्य संस्थेला घेणे आहे.या पथकात सुनिल नेवाळे व डाँ.रोहन राठोड कर निरीक्षक नगरपालिका सुशांत गाडगे,सुनिल उमक,बर्वे,चंदेल व इतर कर्मचारी व गोपाल कानडे पोलिस कर्मचारी यांचा समावेश होता.तसेच याप्रसंगी  सुनील नेवाळे व रोहन राठोड यांनी उर्वरित थकीत करधारकांना पुनश्च आवाहन केले की आपल्या कडील थकीत कर त्वरित भरून शहराच्या विकासासाठी हातभार लावावा व प्रशासनास अशा कारवाईस भाग न पाडता सहकार्य करावे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.